विशेष प्रतिनिधी
पुणे: घोरपडे पेठेतील इमारतीला लागलेल्या आगीतून नागरिकांसह १० पर्शियन मांजरांची सुटका अग्निशमन विभागाने केली आहे. आगीची घटना शुक्रवारी सायंकाळी येथील उर्दू शाळेजवळच्या एका इमारतीत घडली.
Ten Persian cats rescued from house fire in Pune; Accident due to short circuit in Ghorpade Peth
सायंकाळी ६.५५ वाजण्याच्या सुमारास इमारतीला आग लागल्याची माहिती समजताच अग्निशमन पथक घटनास्थळी धावले. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. त्यामुळे आग आणि धुराचे लोट येत होते. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी,असा अंदाज अधिकारी पी. आर. खेडेकर यांनी वर्तविला असून तातडीने कारवाई करून आगीवर नियंत्रण मिळविले. तेथील रहिवाशांसह १० पर्शियन मांजरांचीही सुटका केल्याचे त्यांनी सांगितले.
सॅम्युअल यांच्या मालकीच्या सदनिकेत ही आग लागली होती. तेथे पर्शियन मांजरे अडकल्याचे त्यांनी सांगताच कर्मचारी मंगेश मिलावणे व छगन मोरे यांनी धुराने वेढलेल्या घरात प्रवेश केला आणि तेथील मांजरांची कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुटका केली. आगीने बिथरलेली मांजरे विविध ठिकाणी लपून बसली होती. त्यांच्या बॅटरीच्या प्रकाशात शोध घेतला आणि त्यांना सुखरूप बाहेर काढले.
Ten Persian cats rescued from house fire in Pune; Accident due to short circuit in Ghorpade Peth
महत्त्वाच्या बातम्या
- एकाच पक्षाला कोर्टातून दिलासा कसा मिळतो? भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द झाल्यावर संजय राऊत यांचा सवाल
- ADR Report : भाजपने 2019-20 मध्ये 4847 कोटींची संपत्ती जाहीर केली, इतर राजकीय पक्षांची काय आहे स्थिती? वाचा सविस्तर…
- दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक, ९ महिलांसह ११ आरोपी, दिल्ली पोलिसांची माहिती