• Download App
    दहा सुशिक्षित मित्रांकडूनदुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ; शुद्ध दुध पुरवठ्यासाठी गीर गायींचा गोठा । Ten Educated Friends founded Dairy; Purchased Gir cow and delivering Milk to local people

    दहा सुशिक्षित मित्रांकडूनदुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ; शुद्ध दुध पुरवठ्यासाठी गीर गायींचा गोठा

    विशेष प्रतिनिधी

    उस्मानाबाद : दुधातील भेसळ व त्याचे आरोग्यावरील दुषपरिणाम पाहता उस्मानाबाद येथील दहा सुशिक्षित मित्रांनी गीर गाई खरेदी करून दुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. विशेष म्हणजे त्यांचा व्यवसाय नावारुपास येऊ लागला आहे. Ten Educated Friends founded Dairy; Purchased Gir cow and delivering Milk to local people

    सुरुवातीला पाच गीर गायीपासून सुरु केलेला व्यवसाय आता ६० गायीपर्यंत येऊन पोचला आहे. दररोज सकाळी ५० ते ६० लिटर शुध्द दुध सभासदांना घरपोच दिले जात आहे. शेण आणि गोमुत्रापासूनही उत्पादन घेतले जात आहे. खर्च व उत्पन्न लक्षात घेता जास्त नफा मिळत नसला तरी किमान सर्व सभासदांना स्वच्छ दुध मिळत असल्याचे संजय चव्हाण यांनी सांगितले. गीर गाईचे पोषक व शुध्द दुध ८० रूपये लिटरप्रमाणे विकले जात असून शुद्ध तुपालाही चांगली मागणी वाढत आहे.

    • दहा सुशिक्षित मित्रांकडून दुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ
    • नागरिकांना सकस, शुद्ध दुध पुरवठ्यासाठी उपक्रम
    • उस्मानाबाद येथे उभारला गीर गायींचा गोठा
    • गाईंची संख्या आता पाचवरून साठपर्यंत पोचली
    • प्रतिलिटर ८० रुप्याप्रमाणे दुधाची विक्री
    • गोपालनाबरोबरच शेण, गोमूत्रापासून उत्पन्न
    • गीर गाईच्या दुधाबरोबरच तुपाचेही उत्पादन

    Ten Educated Friends founded Dairy; Purchased Gir cow and delivering Milk to local people

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!