• Download App
    जगातल्या कुठल्याही मंदिरात जाईन, पण आधी आमंत्रण तर येऊ दे!!; मंदिरात तसेही न जाणाऱ्या शरद पवारांच्या कन्येचे उद्गार|temple in the world, but let the invitation come first!!; Exclamation of Sharad Pawar's daughter who does not even go to the temple

    जगातल्या कुठल्याही मंदिरात जाईन, पण आधी आमंत्रण तर येऊ दे!!; मंदिरात तसेही न जाणाऱ्या शरद पवारांच्या कन्येचे उद्गार

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : सध्या देशभर फक्त आणि फक्त अयोध्येतल्या राम जन्मभूमी मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम लल्लांच्या प्रतिष्ठापनेची चर्चा आहे. देशातल्या सगळ्या बड्या नेत्यांना श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने राम मंदिर लोकार्पणाचे निमंत्रण पाठविले आहे. परंतु अनेक नेते तिथल्या निमंत्रणाकडे अजूनही डोळे लावून बसले आहेत. विशेषतः ज्यांनी आयुष्यभर राम मंदिराला विरोध केला, त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचे डोळे राम मंदिराच्या निमंत्रणाकडे लागले आहेत. याचेच प्रत्यंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यातून आले.temple in the world, but let the invitation come first!!; Exclamation of Sharad Pawar’s daughter who does not even go to the temple



    पुण्यात खासदार अमोल कोल्हे यांची शेतकरी आक्रोश यात्रा आली. त्या यात्रेचा पुण्यात समारोप झाला. त्या यात्रेला शरद पवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, संजय राऊत, बाळासाहेब थोरात आदी नेत्यांनी संबोधित केले.

    परंतु, त्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांची संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पणाला जाणार का??, असा प्रश्न विचारला. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी, मी जगातल्या कुठल्याही मंदिरात जाईन, पण आधी आमंत्रण तर येऊ दे, असे उत्तर दिले.

    या त्याच सुप्रिया सुळे आहेत, ज्यांचे पिताश्री शरद पवार यांनी नुकतेच मला राम मंदिराचे निमंत्रण मिळालेले नाही, तसाही मी मंदिरांमध्ये जातच नाही, असे वक्तव्य केले होते. परंतु सुप्रिया सुळे यांनी मात्र जगातल्या कुठल्याही मंदिरात जाण्याची तयारी दाखवली आहे, पण त्यासाठी त्यांना आमंत्रणाची प्रतीक्षा आहे!!

    temple in the world, but let the invitation come first!!; Exclamation of Sharad Pawar’s daughter who does not even go to the temple

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना