• Download App
    Dhurandhar फडणवीस ठरले "धुरंधर"; पण "हे" सुद्धा झाले "साईड हिरो"!!

    फडणवीस ठरले “धुरंधर”; पण “हे” सुद्धा झाले “साईड हिरो”!!

    नाशिक : महाराष्ट्रात 29 महापालिकांच्या निवडणुकीच्या निकालांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरले “धुरंधर” हे जसे दाखवून दिले, तसेच त्यांच्या टीम मधले महत्त्वाचे नेते सुद्धा “साईड हिरो” झाले हे सगळ्या महाराष्ट्रासमोर आले. Dhurandhar

    देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने महाराष्ट्रातले ठाकरे आणि पवार नावाचे दोन ब्रँड संपविले. निवडणूक म्हणजे टीम वर्क आहे हे भाजपच्या नेत्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले.

    महाराष्ट्रात फक्त ठाकरे आणि पवार हेच “ब्रँड” आहेत, अशी टिमकी संजय राऊत यांच्यासोबत अनेक पवार बुद्धीच्या पत्रकारांनी वाजवली होती, पण ती टिमकी महाराष्ट्रातल्या मतदारांनी फोडून टाकली. यासाठी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी मदत केली.

     

    – ही होती फडणवीसांची टीम

    यामध्ये प्रामुख्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील, मुरलीधर मोहोळ, आमदार महेश लांडगे, आमदार अमित साटम, आशिष शेलार, गिरीश महाजन, गणेश नाईक, सुजय विखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर यांचा समावेश राहिला. देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांनी आखलेल्या सुक्ष्म राजकीय रणनीती तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष प्रचार यंत्रणा आतून आणि बाहेरून राबविविण्यापर्यंत या सगळ्या नेत्यांनी जमिनी स्तरावर काम केले. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रत्येक नेत्याच्या बाहूंमध्ये सत्तेचे व्यवस्थित “बळ” भरले. या सगळ्यांनी अत्यंत समन्वयाने काम केले. याचा परिणाम निकालांमध्ये दिसला.

    – संग्राम जगताप हिरो

    यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा मुद्दाम उल्लेख केला कारण अहिल्यानगर मध्ये त्यांनी सुजय विखे यांच्याबरोबर काम करून महापालिका जिंकली. ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांनी आपली हिंदुत्ववादी प्रतिमा चांगली जपली. अहिल्यानगर मध्ये हिंदुत्वाचे काम केले. संग्राम जगताप यांनी अजित पवारांसारखा भाजपचा विश्वासघात केला नाही. त्यामुळे ते अहिल्यानगर मध्ये हिरो ठरले.

    – स्वबळाच्या अतिरेकाचा फटका

    रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, गणेश नाईक आणि गिरीश महाजन यांनी स्वबळाचा अतिरेक केला. या अतिरेकाचा फटका भाजपला अंबरनाथ, मुंबई, नवी मुंबई, नाशिक मध्ये बसला. पण तो फटका निर्णायक ठरला नाही. कारण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांशी चांगला समन्वय ठेवून “स्वबळ” नियंत्रित ठेवले. रवींद्र चव्हाण यांच्या स्वबळाच्या अतिरेकाने भाजपला अंबरनाथ मध्ये सत्ता मिळू शकली नाही. तिथे राष्ट्रवादीचा फायदा झाला. आशिष शेलार यांच्या अतिरिक्त ठाकरे विरोधाने ठाकरे यांचे नुकसान न होता, भाजपला मर्यादित फायदा मिळाला. नाशिक मध्ये गिरीश महाजनांनी 100 चा नारा दिला, पण त्यामध्ये ते यशस्वी झाले नाही. उलट एकनाथ शिंदे यांनी फारसे लक्ष न देता सुद्धा त्यांच्या शिवसेनेला 25 जागा मिळाल्या. गणेश नाईकांनी शिंदेंना ललकारले, तरी शिंदे ऐरोलीत एन्ट्री करण्यात यशस्वी झाले.

    – महेश लांडगे हेच खरे दादा

    पण असे असले तरी भाजपच्या नेत्यांनी थेट अजित पवारांसारखा अतिरेक केला नाही. अजित पवार यांनी भाजपच्या सत्तेचा उपभोग घेऊन ते भाजपवरच उलटले. पिंपरी चिंचवड मध्ये महेश लांडगे नावाच्या पहिलवानाने अजित पवारांना धूळ चारली. वास्तविक महेश लांडगे अजितदादांचे चेले होते. पण अजितदादांनी त्या चेल्यालाच कमी लेखून धूळ चारण्याचे आव्हान दिले. पण देवेंद्र फडणवीस यांनी महेश लांडगे यांना उत्तम “बळ” दिले. अजित पवारांनी विश्वासघात केला. महेश लांडगे यांच्याकरवी देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांनाच धूळ चारली. भाजपच्या एका साध्या आमदाराने उपमुख्यमंत्र्याला हरविले.



    – चंद्रकांतदादा + मुरलीधर मोहोळ जोडगोळी

    पुण्यात चंद्रकांतदादा पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी अजितदादांची दादागिरी पूर्ण संपवली. चंद्रकांतदादा पाटील यांनी तर दक्षिण महाराष्ट्रातील चारही महापालिकांमध्ये भाजपची सत्ता आणली. अत्यंत संयमी भाषा वापरून त्यांनी पक्षाचे उत्तम नेटवर्किंग केले. शिंदे सेनेशी चांगला समन्वय राखला. कोल्हापुरात धनंजय महाडिक, सोलापुरात जयकुमार गोरे यांच्या बरोबरीने काम केले. त्यामुळे पवारांचे सगळे गड उद्ध्वस्त करण्यात चंद्रकांतदादा पाटील यशस्वी ठरले.

    – बावनकुळे, मुंडे आणि बोर्डीकरांची कामे

    विदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी सगळ्यात चांगले नेटवर्किंग केले. विदर्भातल्या सगळ्या महापालिका भाजपने एकहाती जिंकल्या. पण चंद्रपुरात भाजपने काँग्रेस म्हणून आयात केलेल्या आमदार किशोर जोरगेवारांनी विश्वासघात केला.

    – रावसाहेब दानवे जिंकले

    मराठवाड्यात रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना महापालिका जिंकली. मराठवाड्यात पंकजा मुंडे आणि मेघना बोर्डीकर यांनी सुद्धा चांगले नेटवर्किंग केले. सुरेश धस यांनी सुरुवात ताकद लावून प्रचार केला. वर उल्लेख केलेले सगळे नेते आपापल्या भागात हिरो ठरले.

    भाजपकडे देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व होते, पण ते ब्रँड म्हणून भाजपने विकसित केले नव्हते. “पवार बुद्धीची” मराठी माध्यमे तर ठाकरे आणि पवार यांच्यापुढे देवेंद्र फडणवीस यांना तुच्छ लेखत होती. मराठी माध्यम आणि फडणवीस यांना कधीच ब्रँड मानले नव्हते. पण याच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या टीम बरोबर ठाकरे – पवार ब्रँड्सना चपराक हाणलीच, पण “पवार बुद्धीच्या” पत्रकारांचे आणि माध्यमांचे थोबाडही फोडले.

    Team Devendra fadnavis, the real “Dhurandhar”

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ZP च्या निवडणुकीत अजितदादा कोणता वादा करणार??; काय मोफत देणार??; जाहीरनामा लिहिणारी कंपनी अजितदादांना कोणता सल्ला देणार??

    फडणवीसांचे भाकीत ठरले खोटे; राज ठाकरे नव्हे, तर सत्तेच्या वळचणीला राहून सुद्धा पवार ठरले biggest looser!!

    Nitin Gadkari : नागपूरला प्रदूषणमुक्त शहर बनवायचेय; सर्व आश्वासने पूर्ण करायची आहेत, नितीन गडकरींच्या विजयी नगरसेवकांना सूचना