• Download App
    टाटा देणार मुकेश अंबानींना टक्कर, एअरटेलबरोबर 5G क्रांती करणार; टेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा वाढणार। Tata will face Mukesh Ambani, 5G revolution with Airtel; Competition in the telecom sector will increase

    टाटा देणार मुकेश अंबानींना टक्कर, एअरटेलबरोबर 5G क्रांती करणार; टेलिकॉम क्षेत्रात स्पर्धा वाढणार

    वृत्तसंस्था

    मुंबई : आता टाटा कंपनीचा 5G मध्ये प्रवेश होणार असून, एअरटेलच्या मदतीने रिलायन्स जिओला मोठी टक्कर देण्यासाठी तयारी सुरू आहे. त्यामुळे 5G मध्ये टेलिकॉममध्ये मोठी स्पर्धा पहायला मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या प्रवेशानंतर टेलिकॉम क्षेत्रात क्रांतीच झाली. जिओ समोर सर्व टेलीकॉम कंपन्या पालापाचोळ्याप्रमाणे उडून गेल्या.स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. एअरटेलने 5G चाचण्या सुरू केल्या. त्यानंतर मुकेश अंबानी यांनी Jio 5G ची घोषणा केली. Tata will face Mukesh Ambani, 5G revolution with Airtel; Competition in the telecom sector will increase

    भारतात ग्राहक ४जी नेटवर्क वापरत आहे. मात्र, अनेक कंपन्यांनी ५जी चे टेस्टिंग सुरू केल्याने लवकरच 5G सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आता टाटा ग्रुपचा यामध्ये समावेश झाला आहे. टाटा सन्सने टेलिकॉम इक्विपमेंट मेकर तेजस नेटवर्कमध्ये कंट्रोलिंग हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली. या करारानंतर आता टाटा ग्रुपचा 5G मध्ये प्रवेश होणार आहे. टाटा सन्सचे यूनिट पॅनाटोन फिनवेस्टसोबत हे तेजस नेटवर्कमधील ४३.३५ टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. या कराराअंतर्गत कंपनी पॅनोटोनाल २५८ रुपये प्रति शेअर या दराने १.९४ कोटी इक्विटी शेअर देईल. याचे एकूण मुल्य ५०० कोटी रुपये असेल, अशी माहिती तेजसकडून देण्यात आली आहे.



    पॅनाटोनकडून तेजस नेटवर्कच्या १३ लाख इक्विटी शेअर्सचे अधिग्रहण केले जाणार असून, काही वर्षांत हा करार पूर्ण झाल्यानंतर टाटासन्सची तेजस नेटवर्कमध्ये ७२ टक्के हिस्सेदारी असेल. याद्वारे टाटा सन्सच्या कंपनीकडे मोठी हिस्सेदारी येणार आहे. टाटा ग्रुप 5G नेटवर्कच्या जगतात क्रांती आणण्याच्या तयारीत आहे. सॉफ्टवेअर कॅपेबिलिटीबद्दल सांगायचे तर टीसीएसच्या मदतीने हे काम करणे शक्य होईल. तर तेजस नेटवर्कच्या मदतीने हार्डवेअर सपोर्ट मिळेल.

    Tata will face Mukesh Ambani, 5G revolution with Airtel; Competition in the telecom sector will increase

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा