नाशिक : CM MK Stalin ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या मराठीच्या लढ्यासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळकमचे प्रमुख एम. के. स्टालिनने पाठिंबा दिला. पण त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी सनातन धर्माला दिलेल्या शिव्या महाराष्ट्र ठाकरे बंधूंना चालतील का?? महाराष्ट्र ते खपपून घेईल का??, हे खरे कळीचे सवाल आहेत.Tamilnadu CM MK Stalin sports Thackrey brothers
मराठीच्या प्रेमापोटी आणि हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एक झाले. त्यांनी राजकीय अस्तित्व टिकवायला सुरुवात केली. दोन्ही ठाकरे बंधूंची जोरदार भाषणे झाली. भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी ठरवून फक्त उद्धव ठाकरेंना टार्गेट केले. पण तरीदेखील ठाकरे बंधूंचा ऐक्याचा मेळावा यशस्वी व्हायचा तो झालाच त्या पलीकडे जाऊन तामिळनाडूतून त्यांना मोठा पाठिंबा आला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी भले मोठे तमिळमधून ट्विट करून ठाकरे बंधूंच्या मराठीच्या लढ्याला पाठिंबा दिला. आम्ही तामिळनाडू तामिळ भाषेसाठी लढतोय. हे वादळ महाराष्ट्रात पोहोचले. आपण एकत्र लढू या. राज ठाकरेंनी हिंदी भाषिक राज्यांमध्ये कुठली तिसरी भाषा शिकवताय?, हा प्रश्न विचारला, त्याचे उत्तर दिल्लीच्या राज्यकर्त्यांकडे नाही, असे एम. के. स्टालिन यांनी तमिळ भाषेतल्या ट्विटमध्ये लिहिले. ठाकरे बंधूंना तामिळनाडूतून मोठा पाठिंबा आल्याच्या बातम्या सर्व माध्यमांनी दिल्या.
– सनातन हिंदू धर्माला उदयनिधीच्या शिव्या
पण ज्या ठाकरे बंधूंनी मराठी बरोबरच हिंदुत्वाचा गजर केला, त्या ठाकरे बंधूंना महाराष्ट्रात तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा घेणे परवडेल का??, हा खरा सवाल आहे. याच तामिळनाडूच्या मुख्यमंत्री स्टालिन यांच्या पुत्राने म्हणजेच उदयनिधीने सनातन हिंदू धर्माला वाटेल तशा शिव्या दिल्या होत्या. सनातन हिंदू धर्म म्हणजे डेंग्यू मलेरिया एड्स यांच्यासारखा रोग आहे त्याचे निर्मूलन केले पाहिजे, असे तो म्हणाला होता. त्यावरून सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस झाल्या होत्या. उदयनिधी बरोबरच ए. राजा आणि दयानिधी मारन या तमिळ नेत्यांनी देखील सनातन हिंदू धर्माला शिव्या दिल्या होत्या. स्टालिन यांचा द्रविड मुन्नेत्र कळघम हा पक्ष पुरोगामी असल्याचा बाता मारून तामिळनाडू राजकारण चालवत राहिला. त्याचाच परिणाम म्हणून त्या पक्षाच्या नेत्यांनी सनातन धर्माला शिव्या दिल्या.
पण महाराष्ट्रात असल्या शिव्या सहन करणे ठाकरे बंधूंना राजकीय दृष्ट्या परवडेल का??, हा कळीचा सवाल आहे. कारण तामिळनाडू भाजपने आपल्या प्रचाराचा सगळा रोख आणि भर सनातन हिंदू धर्माच्या समर्थनावर लावला. तामिळ – काशी संगम याचा जोरदार प्रचार केला. त्यासाठी त्यांना जयललिता यांचा वारसा चालविणाऱ्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचा पाठिंबाही मिळाला.
आता जेव्हा सनातन हिंदू धर्माला शिव्या देणाऱ्या द्रविड मुन्नेत्र कळघमच्या सर्वोच्च नेत्याने ठाकरे बंधूंना पाठिंबा दिलाय, तो जर ठाकरे बंधूंनी स्वीकारला, तर भाजपच्या हातात आयते कोलीत दिल्यासारखे होणार आहे. कारण स्टालिन यांनी एकीकडे भाषिक प्रेमाचा उमाळा आणताना दुसरीकडे सनातन हिंदू धर्माला दिलेल्या शिव्यांचा भडीमार भाजप ठाकरे बंधूंवर वळविल्याशिवाय राहणार नाही. अशावेळी स्टालिन यांचा पाठिंबा स्वीकारायच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंना मोठी राजकीय कसरत करावी लागणार आहे.
Tamilnadu CM MK Stalin sports Thackrey brothers
महत्वाच्या बातम्या
- संघ + सेवा सहयोग उपक्रमाची 10 वर्षे : निर्मल वारी उपक्रमामुळे वारी मार्गातील गावांमधील अस्वच्छता घटली तब्बल 80 % !!
- ICMR : कोविडनंतर अचानक होणाऱ्या मृत्यूंवर अभ्यास; ICMRचा दावा- लसीशी याचा संबंध नाही
- Delhi : दिल्ली- जुन्या वाहनांसाठी ‘नो-फ्यूल’ आदेश मागे घेण्याची तयारी; मंत्री म्हणाले- प्रदूषण थांबवायला हवे
- Ranvir Shorey : अमराठी दुकानदाराला मारहाण, राक्षस मोकाट फिरत आहेत म्हणत रणवीर शौरीचा मनसेवर संताप