प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारी ठाकरे – आंबेडकर भेट कधीही होऊ शकते, अशी चर्चा मराठी माध्यमे फार पूर्वीपासून घडवत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दोन पक्षांच्या युतीचे ऑफर देऊनही काही महिने उलटले आहेत. मात्र या ऑफरला उद्धव ठाकरेंनी अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. अखेरीस 20 नोव्हेंबर 2022 रोजी प्रबोधन प्रकाशनाच्या कार्यक्रमात ठाकरे – आंबेडकर एकत्र येणार असल्याची देखील चर्चा आहे. मात्र, त्याआधीच मात्र त्या बहुचर्चित भेटी आधीच एक महत्त्वाची भेट आजच 16 नोव्हेंबर 2022 रोजी घडली आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची. ही भेट देखील घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर!! Talk about Thackeray-Ambedkar meeting, but actually the meeting was between Shinde and Ambedkar
एकनाथ शिंदे यांनी राजगृहावर जाऊन प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आणि या संदर्भात आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून तपशीलवार माहिती दिली. आपल्या फेसबुक अकाउंट वर त्यांनी या भेटीचे फोटोही शेअर केले आहेत.
या फेसबुक पोस्टमध्ये एकनाथ शिंदे म्हणतात :
भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, #भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रदीर्घ काळ वास्तव्य असलेल्या मुंबईतील #दादर येथील #राजगृह या निवासस्थानी भेट देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यासमयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते. त्यांच्या साथीने डॉ. बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वास्तूमधील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेल्या रोजच्या वापरातील अनेक वस्तू, त्यांची अभ्यास खोली, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संग्रह, त्यांची लेखणी, असा अनमोल ठेवा पाहण्याची संधी मला लाभली.
या प्रसंगी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार भावना गवळी, डॉ. बालाजी किणीकर, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते राहुल लोंढे तसेच आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यकर्ते यावेळी आवर्जून उपस्थित होते.
या भेटीमध्ये नेमकी काय राजकीय चर्चा झाली?, मुंबईसह 16 महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदा निवडणुका यामध्ये एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात प्रत्यक्ष युती होणार?, की काही पॉलिटिकल ऍडजेस्टमेंट होणार?, या विषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Talk about Thackeray-Ambedkar meeting, but actually the meeting was between Shinde and Ambedkar
महत्वाच्या बातम्या
- म्हणे, आफताब एकलकोंडा होता, उघडा डोळे बघा नीट, त्याची “ही” एकलकोंडी!
- मेरा अब्दुल वैसा नही है!!, हिंदू मुली अशा का वागतात?
- बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे – फडणवीस आज हिंदुत्वाचा वारसा कार्यक्रमात सावरकर स्मारकात एकत्र
- आफताब – श्रद्धा लव्ह जिहादवर संताप उसळला असताना मराठी माध्यमांचा व्हिक्टीम कार्ड आणि पॉझिटिव्ह स्टोरीचा फंडा