• Download App
    सुष्मिताच्या तालीचं सुबोध भावे कडून कौतुक, समाज माध्यमातून पोस्ट लिहीत केलं कौतुक | Tali web series sushmita sen

    सुष्मिताच्या तालीचं सुबोध भावे कडून कौतुक, समाज माध्यमातून पोस्ट लिहीत केलं कौतुक

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यांची बहुचर्चित भाऊ प्रतिक्षित ताली ही वेब सिरीज जिओ सिनेमावर 15 ऑगस्ट रोजी रिलीज झाली.या वेब सिरीजचं सर्वत्र कौतुक होत आहे. सुष्मिता सेन ची भूमिका आणि सुष्मिता सेनेचा वेब सिरीज मध्ये असलेले लुक याची सगळीकडे सध्या तुफान चर्चा आहे. Tali web series sushmita sen

    ट्रान्सजेंडर वूमन असलेल्या गौरी सावंत वर ही वेब सिरीज आधारित आहे. गौरीचा संपूर्ण आयुष्य तिचा संघर्ष समाजासमोर यावा आणि तृतीयपंथीय लोकांचं आयुष्य सर्वसामान्यांना समजा व यासाठीची ही वेब सिरीज आहे.यामध्ये सुस्मिता सेन यांनी गौरी सावंत यांची भूमिका केली असून, ही भूमिका सध्या नेटकर यांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. या वेब सिरीज मधले अनेक सीन्स ट्विटर वर क्लिक करून त्या सीनचं कौतुक सर्वत्र होत आहे.



    सध्या ट्विटर वर ताली ही वेब सिरीज ट्रेंड करत आहे.

    अनेकांनी आतापर्यंत ही वेब सिरीज बघितली असून या वेब सिरीज बाबतच्या प्रतिक्रिया समाज माध्यमांवर मांडला जात आहेत.यामध्येच मराठी अभिनेता सुबोध भावे यांनी देखील ही वेब सिरीज बघितली आणि या वेब सिरीज बघितल्यानंतर त्याने या वेब सिरीज चा भरभरून कौतुक केला आहे. त्याने या वेब सिरीज बद्दल समाज माध्यमांतून एक पोस्ट लिहिली आहे.

    सुबोध भावे आपल्या पोस्टमध्ये लिहितात

    • श्री गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित ताली ही अप्रतिम वेब मालिका जिओ सिनेमावर पहिली.
    • बस बाई बस या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री गौरी यांच्या शी संवाद साधण्याचा योग आला होता.
    • क्षितिज पटवर्ध मित्रात्यांचे संपूर्ण आयुष्य तू ज्या पद्धतीने तुझ्या लेखणीतून उतरवलं आहेस.त्याला तोड नाही.

    खूप खूप कौतुक तुझे.

    पुढे त्याने या सिरीज मध्ये कामं केलेल्या मराठी कलाकारांबद्दल देखील पोस्टमध्ये उल्लेख करत कौतुक केलं आहे. हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, नंदू माधव, शितल काळे, तुम्ही तुमच्या भूमिका किती चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत.
    रवी जाधव देवा तुझ्या प्रत्येक कलाकृती मध्ये तुझा खास असा ठसा असतो. या कलाकृतीमध्ये तो कायमचा आमच्या मनावर कोरला गेला आहे.प्रेम,कृतिका,देव गणेश गौरी ही व्यक्तिरेखा उभा राहण्यातं तुझा खूप मोठा वाटा आहे.
    सुबोधने पोस्टमध्ये सुश्मिता सेन यांचंही विशेष कौतुक केलंय. सुश्मिता सेन तुम्ही फक्त त्या झाला होता. बस इतकंच श्री गौरी सावंत तुमचं मनापासून अभिनंदन

    Tali web series sushmita sen

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    17 मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर; त्याला कुणाशी, कशासंदर्भात बोलायचे होते??, प्रश्न अनुत्तरीत!!

    सत्याच्या मोर्चाची दुसरी बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये; राज आणि उद्धव हजर, पण पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र गैरहजर, बैठकीचे महत्त्व राहिलेच काय??

    Maharashtra SEC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच; कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण