प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवडणूक नियम बदलून आवाजी मतदानाने घेणे हे घटनाबाह्य असल्याचे मत राज्यपालांनी भगतसिंग कोशीयारी यांनी महाविकास आघाडी सरकारला कळवल्याची बातमी मराठी प्रसार माध्यमांनी दिली आहे. Taking the “voice” of the Assembly Speaker election is unconstitutional, the role of the Governor
यावर महाविकास सरकार आता नव्याने पत्र तयार करून राज्यपालांकडे पाठविण्याच्या तयारीत आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसंदर्भात महा विकास आघाडीचे राज्यपालांना हे तिसरे पत्र असेल. एकूण विधानसभा अध्यक्षांची निवडणूक राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात पत्रापत्री सुरू झाल्याने आणखी काही काळ लांबणार आहे हे हे स्पष्ट झाले आहे.
गुप्त मतदानाचा नियम बदलून आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्यावर महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ठाम आहेत. महाविकास आघाडी सरकारने तशी तयारी देखील केली आहे. परंतु, आता अधिवेशनाला फक्त एक दिवस उरला आहे. राज्यपालांनी अद्याप महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली नाही. उलट नियम बदलून आवाजी मतदानाने विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेणे घटनाबाह्य असल्याचे मत महाविकास आघाडी सरकारला कळविले आहे.
आता राज्यपालांनी घेतलेल्या घटनात्मक आक्षेपांवर तज्ञांकडून उत्तर तयार करून घेऊन त्याचे पत्र राज्यपालांना तातडीने पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यपाल काय निर्णय घेतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. परंतु या पत्रापत्रीच्या गदारोळात महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा मनसूबा मात्र या हिवाळी अधिवेशनात पुरता तरी वाया गेलेला दिसत आहे.
Taking the “voice” of the Assembly Speaker election is unconstitutional, the role of the Governor
महत्त्वाच्या बातम्या
- Salman Khan Birthday : ‘एकदा नाही तर तीनदा चावला विषारी साप’ ! स्वतः सलमानने सांगितला परवाचा किस्सा …
- सोन्याला आणखी झळाळी मिळणार, दर वाढण्यास पोषक वातावरण
- मोठी बातमी : बीडमधील २०० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे स्वेच्छा मरणाची मागणी
- विधानसभा अध्यक्षांच्या “आवाजी” निवडणुकीसाठी ठाकरे – पवारांची लगीन घाई; विधीमंडळातच बोलवली कॅबिनेट बैठक!!