• Download App
    शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीवर चालायचे हे एकदम अमान्य; श्रीमंतांनी आरक्षण सोडावे!! Taking the name of Shivaji Maharaj and acting on caste is absolutely unacceptable

    शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीवर चालायचे हे एकदम अमान्य; श्रीमंतांनी आरक्षण सोडावे!!

    सुशील कुमार शिंदेंचे परखड प्रतिपादन

    प्रतिनिधी

    सोलापूर :  महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा विषय प्रचंड तापला असताना माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी परखड मत व्यक्त केले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीवर चालायचे हे एकदम अमान्य आहे. आवश्यक आहे तोपर्यंतच आरक्षण द्यावे श्रीमंतांनी आरक्षण सोडून द्यावे. गरज असेल त्यालाच आरक्षण हेच धोरण राबवावे, असे  सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले  Taking the name of Shivaji Maharaj and acting on caste is absolutely unacceptable

    – सुशीलकुमार शिंदे म्हणाले : 

    आरक्षणाचा विषय, जातनिहाय जनगणना या विषयांवर काँग्रेस पक्षापेक्षा माझे वेगळे मत आहे. शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीव्यवस्थेवर काम करायचे हे मला मान्य नाही. ज्यांना आरक्षणाचा आधीच लाभ झाला आहे, त्यांनी आरक्षण सोडून दिले पाहिजे, श्रीमंतांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये. ओबीसींचे आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये.

    सन 1980 पर्यंत जात हा मुद्दा राज्यात महत्त्वाचं नव्हता, 1985 नंतर मात्र परिस्थिती बदलली. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचा आणि जातीव्यवस्थेवर चालायचे हे मला अजिबात मान्य नाही. जातीचा आणि आर्थिक विषयाचा काहीही संबंध नाही. पण राज्यात सुरू असलेली परिस्थिती पाहता चिंता वाटायला लागते, पुढे काय होईल सांगता येत नाही.

    आरक्षण द्यायचे सरकारने कबुल केले असेल तर ते त्यांनी द्यायला हव, कायद्याच्या चौकटीत ते कसं बसवयचं हे सरकारने ठरवावे. कोणाचेही आरक्षण काढून देऊ नये, स्वतंत्र कायदा केला पाहिजे. जोपर्यंत आवश्यकता आहे तोपर्यंतच आरक्षण वापरलं पाहिजे, नंतर सोडलं पाहिजे. ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊ नये.

    माझ्यासाठी जात मुद्दा महत्त्वाचा नाही

    माझ्याबाबतीत जात हा मुद्दा महत्त्वाचा ठरला असे मला वाटतं नाही, कारण मी अनेकदा मी जनरल सीटवर निवडून आलो आहे. मी सर्वधर्म समभाव मानणारा माणूस आहे. मला मुख्यमंत्रीपद पुन्हा मिळाले नाही, त्याला जात हे कारण असावे असे मला वाटत नाही. पण सोनिया गांधी यांचा फोन होता, त्यानी सांगितले की मी तुम्हाला राज्यपाल करणार आहे, ते मी स्वीकारले. मला याबाबतीत कुठलीही खंत वाटली नाही, उलट मला एकदा राज्यपाल व्हायचे होते, ते सोनिया गांधींनी पूर्ण केलं. पण मी राज्यपालपद स्वीकारले म्हणून पुढच्या काळात मला ऊर्जा मंत्री, गृहमंत्री केले.

    मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे मी जाहीर केलं आहे. मी प्रणिती शिंदे यांचं नाव सुचवलेलं आहे, पण निर्णय हायकमांड घेईल.

    सावरकरांची हिंदुत्वाची भूमिका मला मान्य नाही, पण पतितपावन मंदिराबाबतीत त्यांची भूमिका मला मान्य आहे म्हणून मला ते आवडतात. पण त्यांच्या सर्व भूमिका मान्य नाहीत.

    मी गांधी घरण्याशी लॉयल आहे, माझ्या सारख्या माणसाला इथंपर्यंत पुढे शक्य होतं का? दलितांना पुढे आणण्याचा त्यांचा विचार आहे, त्यामुळे मी मुख्यमंत्री झालो, अन्यथा मी कधीच मुख्यमंत्री झालो नसतो. मी बीएसएफ ट्रेनिंग सेंटर, बोरमणी विमानतळ, हन्नूर येथे SSB ट्रेनिंग सेंटरसाठी प्रोजेक्ट आणले. पण त्याला पुढे कोणीही नेलं नाही. त्यामुळे हे प्रोजेक्ट अद्याप ही रखडलेलं आहेत. केवळ एक माळढोक पक्षीमुळे बोरामणी विमानतळ रखडलेलं आहे.

    शरद पवारांवर टीका का करत नाही?

    इंदिरा गांधी म्हणाल्या की, शिंदे आप शरद पवार पर कभी बात नही करते, तेव्हा मी सांगितलं की मी पोलीस असताना त्यांनी मला राजकारणात आणलं. तिकीट देण्यापासून निवडणुकीच खर्च देईपर्यंत शरद पवार यांनीच केला. पण तुम्ही सांगितलं तर मी टीका करतो, तेव्हा इंदिरा गांधी म्हणाल्या की लोक असं म्हणतात, पण तुम्ही अशी टीका करण्याची गरज नाही.

    Taking the name of Shivaji Maharaj and acting on caste is absolutely unacceptable

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!