विशेष प्रतिनिधी
पुणे : तुमची भावकी टक्केवारी घेऊन पैसे खाते, अशी तक्रार थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेच करण्यात आली आहे. सुजय पवार याच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.
बारामतीत विहिरीच्या मागे अजित पवारांची भावकी पैसे खात असल्याची तक्रार अजित पवारांकडे आली. तेव्हा अजित पवारांनी संबंधित व्यक्तीचे नाव घेत म्हणाले जर त्याने पैसे खाल्ले असतील, तर त्याचं काही खरं नाही.बारामती तालुक्यातील सार्वजनिक विहिरींच्या कामांमध्ये आणि जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विकास कामांमध्ये टक्केवारी घेऊन काम करणाऱ्यांना सोडणार नाही.
अजित पवार म्हणाले, आपण मोफत विहीरी देतो. आमची भावकी त्यामध्ये पैसे मागते अशा पद्धतीची तक्रार आहे. मी एकच बाजू बघून बोलत नाही मला त्याची शहानिशा करावी लागेल. या संदर्भातील पत्र दिले आहे. दादा तुम्ही एवढे काम करता पण ते खालचे लोक कसे काम करतात ते बघा…सुजय पवार असे त्या व्यक्तीचे नाव आहे. एका विहरीमागे ते 75 हजार घेतात.जर ते पैसे घेत असतील तर त्यांच काही खरं नाही… पैसे न घेता चांगलं काम करत असतील त्यांना माझ्या शुभेच्छा आहे.
सरकारी योजनेतून पैसे खाऊ नका. याच्या खोलात जाऊ माझ्या कार्यलयाकडून चौकशी होईल. सध्या बारामतीत उपमुख्यमंत्री कार्यालयातील चार लोकं काम करतात परंतु नावाला चौघं दिसली नाही पाहिजे, काम देखील दिसले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
बारामतीत सार्वजनिक टॉयलेट एवढं चांगले करणार आहे की, घरात पण असे टॉयलेट नसेल. 1 कोटी 20 लाख एकाची किंमत आहे. टॉयलेटला जायला पैसे लागणार आहेत, उगाच इकडे तिकडे बघायचं आणि सोडायचं असे चालणार नाही असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.
दरम्यान,पुरंदरचे विमानतळ जिथे नागरी उड्डाण खात्याने ठरवले आहे तिथेच होईल, काही लोकांची नाराजी घ्यावी लागे तरीही ते तिथेच होईल, असे अजित पवारांनी सांगितले.
taking percentage and money, direct complaint to Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- Budget 2025 कडून अपेक्षा; वैयक्तिक कर कमी करा, कर रचना सुधारा त्यातून महसूल वाढेल!!
- Rakesh Rathod : काँग्रेस खासदार राकेश राठोड यांना भर पत्रकारपरिषदेतून अटक
- Amit Shah : ‘अरविंद केजरीवाल यांनी विषाचे नाव सांगावे’
- MSME कंपन्यांसाठी सरकारने १०० कोटी रुपयांपर्यंतची नवीन कर्ज हमी योजना केली सुरू