प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात आता महापालिका निवडणुका लवकर घ्या, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. Take municipal elections early in Maharashtra; Raj Thackeray’s demand
ठाण्यातील एका कार्यक्रमात राज ठाकरे आले असताना त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. यात राज ठाकरेंनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले. विशेष म्हणजे राज्यात महापालिका निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात. कारण गेल्या काही वर्षांपासून महापालिकांवर तीन-तीन वर्षांपासून प्रशासक कामकाज पाहत आहेत.
Raj Thackeray : मनसे इफेक्ट; मुंब्रा, कापूरबावडीतील मशिदींवरील भोंगे उतरवले!!
जर लोकप्रतिनीधी नसतील तर जे प्रशासकीय अधिकाऱ्यावर वचक राहणार नाही. त्यामुळे शहरांचा विकास होत नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिले, नसल्याचे मत राज ठाकरेंनी व्यक्त केले आहे.
राज ठाकरे म्हणाले की, लोकांचे प्रश्न, समस्या सोडवणारे लोकप्रतिनिधी महापालिकेत नसतील तर समस्या सुटणार कशा, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. यासह निवडणुकीत असणारी पॅनल सिस्टिम योग्य नाही. वॉर्डात काम झाले नाही तर कोणाला जबाबदार धरणार? महापालिका निवडणुकीत पूर्वी वापरण्यात येणारी वॉर्ड पद्धत योग्य होती. तर पॅनल सिस्टिम ही राजकीय पक्षांची मतांची सोय असल्याचे सांगत राज ठाकरेंनी प्रभाग समिती पद्धतीवरही टीका केली.
Take municipal elections early in Maharashtra; Raj Thackeray’s demand
महत्वाच्या बातम्या