चारशे ते हजार रूपयां पर्यतचे तिकिट ठेवण्यात आले आहे.विविध ठिकाणच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये हा सामना दाखविण्यात येणार आहेत.T20 world cup 2021: India-Pakistan match thriller at multiplex theater in Pune
विशेष प्रतिनिधी
पुणे : ढोल ताशांचा गजर, प्रत्येक चौका आणि छक्क्यावर आवाज, क्रिकेट टीमचा ड्रेस परिधान केलेल्या चाहत्यांपासून चीअर गर्ल्सपर्यंतचा थेट अनुभव. तुम्हाला हे वातावरण स्टेडियममध्ये नाही तर मल्टिप्लेक्समध्ये पहायला मिळणार आहे.
रविवार २२ तारखेपासून चित्रपटगृहे खुली होणार आहेत. मात्र, एक-दोन अपवाद सोडले तर गर्दी खेचू शकतील असे चित्रपट प्रदर्शित होत नसले तरी शहरातील मल्टिप्लेक्स रविवारी हाउस फुल होणार आहेत.
टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान’चा पहिला सामना रविवारी २४ ऑक्टोबरला होणार असल्याने प्रेक्षकांना हा सामना मोठ्या पडद्यावर पाहाण्याची सोय चित्रपटगृह चालकांनी उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी चारशे ते हजार रूपयां पर्यतचे तिकिट ठेवण्यात आले आहे.विविध ठिकाणच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये हा सामना दाखविण्यात येणार आहेत.
चित्रपटगृह उघडणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्या निर्माते किती प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येतील याचा अंदाज घेऊनच नवीन चित्रपट प्रदर्शित करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे चित्रपटगृह खुली झाली तरी नवीन चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
मात्र, पहिल्या आठवडा रिकामा जाऊ नये यासाठी चित्रपटगृह चालकांनी एक अनोखी युक्ती लढवली आहे.आता ही युक्ती यशस्वी होतीये का? प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतोय हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.
T20 world cup 2021: India-Pakistan match thriller at multiplex theater in Pune
महत्त्वाच्या बातम्या
- बांगलादेशातील हिंदूंवरचे हल्ले “छोट्या घटना”; इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सच्या महासंचालकांचे वादग्रस्त वक्तव्य
- औरंगाबादमध्ये हुतात्मा पोलिसांना अभिवादन; शहर पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मैदानात कार्यक्रम
- Nepal Floods : नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार, 77 जण ठार, अनेक जण बेपत्ता, बचाव कार्य सुरू
- धर्मांतरप्रकरणी अडकलेल्या IAS इफ्तिखरुद्दीन यांना निलंबित करणार योगी सरकार, एसआयटीच्या अहवालात धक्कादायक खुलासे