गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी दिली माहिती
विशेष प्रतिनिधी
मुंबई : डेअरी उत्पादने कंपनी अमूलची ‘अटरली बटरली’ गर्ल कॅम्पेन तयार करणाऱ्या सिल्वेस्टर डाकुन्हा यांनी वयाच्या ८० व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन (GCMMF) चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. Sylvester Dacunha producer of Amul Girl Utterly Butterly passed away
जाहिरात उद्योगातील दिग्गज व्यक्तिमत्व आणि ज्यांनी अटरली बटरली गर्लची संकल्पना मांडली त्या सिल्वेस्टर डाकुन्हा यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा राहुल डाकुन्हा असा परिवार आहे.
GCMMF चे व्यवस्थापकीय संचालक जयेन मेहता म्हणाले, “मुंबईतील डाकुन्हा कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष सिल्वेस्टर यांच्या निधनाने खूप दुःख झाले आहे. सिल्वेस्टर डाकुन्हा यांनी 1966 मध्ये GCMMF च्या मालकीच्या Amul या ब्रँडसाठी ‘Utterly Butterly’ मोहिमेची कल्पना केली, ज्यांनी ‘अमूल गर्ल’ जगासमोर आणली आणि आजही सुरू आहे.
जगातील सर्वात जास्त काळ चालणाऱ्या जाहिरातींपैकी एक –
सिल्वेस्टर डकुन्हा यांनी 1966 मध्ये अमूल गर्ल जाहिरातीची कल्पना मांडली. पांढऱ्या आणि लाल ठिपक्याच्या फ्रॉकमध्ये दिसणाऱ्या या गोंडस मुलीमुळे अमूल ब्रँडला देशात आणि जगात नवी ओळख मिळाली. अमूलचे जनरल मार्केटिंग मॅनेजर पवन सिंग यांनी सांगितले की, सिल्वेस्टर यांच्या निधनामुळे त्यांना दु:ख झाले आहे. ते म्हणाले की, अमूल गर्ल ही जगातील सर्वाधिक काळ चालणाऱ्या जाहिरातींपैकी एक आहे. कंपनीने जाहिरातींच्या माध्यमातून नवीन उंची गाठली. त्याची पोहोच आणि लोकप्रियता पिढ्यानपिढ्या प्रिंट, टीव्ही, नंतर डिजिटल आणि सोशल मीडियाद्वारे वाढत गेली.