विशेष प्रतिनिधी
ठाणे : सोमवार – शनिवार दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला. या निर्णयाचे ठाण्यातील व्यापाऱ्यांनी पेढे वाटून स्वागत केले आहे.
कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने महाराष्ट्रातील निर्बंध शिथिल केले आहेत. राज्य सरकारने २२ जिल्ह्यामध्ये निर्बंध शिथिल तर ११ जिल्ह्यात जैसे थे ठेवले आहेत.sweets Distributed By merchants in Thane; Welcome the decision to relax restrictions
ठाण्यात देखील निर्बंध शिथिल केल्यानंतर व्यापाऱ्यांनी पेढे वाटून सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. निर्बंध शिथिल करण्यासाठी व्यापाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने देखील केली.
त्यांच्या आंदोलनाला यश आले असून सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. दुकाने दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहेत. सोमवार ते शनिवार पर्यंत दुकाने १० वाजे पर्यंत खुली रहणार असून रविवारी मात्र सर्व दुकाने बंद असतील.
- ठाण्यातील व्यापाऱ्यांकडून मिठाईचे वाटप
- निर्बंध शिथील केल्यामुळे व्यापारी आनंदले
- व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला अखेर आले यश
- सोमवार – शनिवार दुकाने रात्री 10 वाजेपर्यंत सुरु
- रविवारी मात्र सर्व दुकाने बंद राहणार