• Download App
    नुसते स्वराज्य रक्षक नव्हे; स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज; पुरवणी मागण्यांच्या पुस्तिकेत करणार बदल Swarajya rakshk dharmaveer chatrapati sambhji maharaj will be done in supplementary demands booklet of government of maharashtra

    नुसते स्वराज्य रक्षक नव्हे; स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज; पुरवणी मागण्यांच्या पुस्तिकेत करणार बदल

    प्रतिनिधी

    मुंबई : छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हे, केवळ स्वराज्य रक्षक होते, असे विधान करीत विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी वाद ओढवून घेतला होता. मात्र, अजितदादांवर तोंडसुख घेणाऱ्या शिंदे – फडणवीसांनीही पुरवणी मागण्यांच्या पुस्तिकेत संभाजी महाराजांचा उल्लेख फक्त स्वराज्यरक्षक असाच कायम ठेवल्याने विधिमंडळात त्याची जोरदार चर्चा रंगली. त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन सादर करून “स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”, असा बदल केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. Swarajya rakshk dharmaveer chatrapati sambhji maharaj will be done in supplementary demands booklet of government of maharashtra

    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ (मौजे तुळापूर ता. हवेली) आणि समाधी स्थळ स्मारक (वढू (बु.) शिरूर) येथील विकास आराखड्यास नियोजन विभागाने २८ जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या नावामध्ये अंशतः बदल करण्यात आला असल्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम ४६ अन्वये विधान परिषदेत केले.


    छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच!!; “पानिपत”, “नेताजी”कार विश्वास पाटलांचा निर्वाळा


    या विकास आराखड्याच्या नावात अंशतः बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सुधारित नाव ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, तालुका हवेली आणि समाधी स्थळ स्मारक वढू (बु.), शिरूर, जि. पुणे विकास आराखडा, असे निश्चित करण्यात आले आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

    Swarajya rakshk dharmaveer chatrapati sambhji maharaj will be done in supplementary demands booklet of government of maharashtra

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस