• Download App
    स्वराज्य ध्वज यात्रेचे वढू बुद्रुकला आगमन;  जगातील मोठा भगवा ध्वज दसऱ्याला फडकणार । Swarajya Dhwaj Yatra Arrive at Vadhu Budruk

    स्वराज्य ध्वज यात्रेचे वढू बुद्रुकला आगमन;  जगातील मोठा भगवा ध्वज दसऱ्याला फडकणार

    वढू बुद्रुक /पुणे : देशातील सर्वात उंच स्वराज्यध्वज उभा राहणार आहे. य स्वराज्य ध्वज यात्रेचे आज धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचे समाधीस्थळ वढू बुद्रुक येथे आगमन झाले. Swarajya Dhwaj Yatra Arrive at Vadhu Budruk

    एकूण ७२ प्रार्थनास्थळांवर स्वराज ध्वजाचे पूजन करण्यात येणार आहे. स्वराज्य ध्वजाच्या या प्रवास मोहिमेला समाजातील सर्वच स्तरांमधून प्रतिसाद मिळत आहे. हा ध्वज ७४ मीटर लांबीचा आणि जगातील सर्वात उंच ध्वज आहे.

    राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतून तिथल्या प्रेरणास्थळांना अभिवादन करत यशस्वीरीत्या वाटचाल करणारी स्वराज्य ध्वज यात्रा आज प्रवासाच्या शेवटच्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात पोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श स्वराज्याची आठवण करून देण्यासाठी ही नावीन्यपूर्ण कल्पना राज्यात राबवल्याबद्दल राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांचीही प्रशंसा होत आहे.

    • स्वराज्य ध्वज यात्रेचे वढू बुद्रुकमध्ये आगमन
    • धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांना अभिवादन
    • एकूण ७२ प्रार्थनास्थळांवर स्वराज ध्वजाचे पूजन
    • राज्यभर स्वराज्य ध्वज यात्रा काढली आहे
    • प्रवासाच्या शेवटच्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात
    • कर्जत-जामखेड येथील शिवपट्ट्ण अर्थातच खर्ड्याचा भुईकोट किल्ल्यात उभारणार
    • किल्ल्याला नवी ओळख देण्याचा संकल्प
    • भव्य-दिव्य भगवा ध्वज दसऱ्याला फडकणार

    Swarajya Dhwaj Yatra Arrive at Vadhu Budruk

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू