• Download App
    ऊस दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी चक्काजाम आंदोलन करणार! Swabhimani Shetkari Saghtana will do chakkajam protest for sugarcane price

    ऊस दर वाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे शेतकरी चक्काजाम आंदोलन करणार!

    शेतकरी संघटना आणि कारखानदारांची तिसरी बैठकही निष्फळ

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : ऊस दर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता १९ नोव्हेंबर रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही घोषणा केली आहे. Swabhimani Shetkari Saghtana will do chakkajam protest for sugarcane price

    कोल्हापूरात आज या संदर्भात पार पडलेली शेतकरी संघटना आणि कारखानदारांची तिसरी बैठकही निष्फळ ठरली. अखेरपर्यंत काहीच तोडगा निघाला नाही. बैठकीच्या सुरुवातीसच गोंधळ पाहायला मिळाला, मात्र नंतर बैठक सुरू झाली परंतु तोडगा काढण्यात यश आले नाही.

    पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील हंगामातील ४०० रुपयांसाठी कमिटी नेमण्याचा प्रस्ताव दिला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तो धुडकावला आहे. अखेर आता ऊस दराचे आंदोलन पुन्हा चिघळणार असल्याचे दिसते.

    Swabhimani Shetkari Saghtana will do chakkajam protest for sugarcane price

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    17 मुले आणि दोन वृद्धांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काऊंटर; त्याला कुणाशी, कशासंदर्भात बोलायचे होते??, प्रश्न अनुत्तरीत!!

    सत्याच्या मोर्चाची दुसरी बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये; राज आणि उद्धव हजर, पण पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र गैरहजर, बैठकीचे महत्त्व राहिलेच काय??

    Maharashtra SEC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच; कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण