• Download App
    लव्ह जिहादला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांच्याविरोधात सुवर्णकार समाज आक्रमक, गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा। Suvarnakar Samaj aggressively warns Bachchu Kadu, a supporter of Love Jihad, warns of self-immolation

    लव्ह जिहादला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांच्याविरोधात सुवर्णकार समाज आक्रमक, गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा

    आंतरधर्मीय लग्न कोण रोखतो ते पाहतो, या लग्नात येऊन मी नाचेन असे म्हणत लव्ह जिहादला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांच्याविरोधात सुवर्णकार समाज आक्रमक झाला आहे. कडू यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. Suvarnakar Samaj aggressively warns Bachchu Kadu, a supporter of Love Jihad, warns of self-immolation


    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : आंतरधर्मीय लग्न कोण रोखतो ते पाहतो, या लग्नात येऊन मी नाचेन असे म्हणत लव्ह जिहादला पाठिंबा देणाऱ्या बच्चू कडू यांच्याविरोधात सुवर्णकार समाज आक्रमक झाला आहे. कडू यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

    नाशिक येथील रसिका आणि आसिफ यांच्या आंतरधर्मीय विवाहासंदर्भात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सुवर्णकार समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. सर्वशाखीय सुवर्णकार समाजाने कडू यांच्याविरुध्द गुन्हा दाखल व्हावा, त्यांनी समाजाची जाहीर माफी मागावी आणि राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.

    विधानाने व्यथित झाल्यामुळे महाराष्ट्र लाड सुवर्णकार समाज संस्थेचे विश्वस्त सुनील माळवे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. येथील प्रसाद आडगांवकर यांची मुलगी रसिका आणि आसिफ खान यांचा विवाह नोंदणी पध्दतीने झाला आहे. आडगांवकर यांच्या इच्छेनुसार १७ जुलै रोजी तो हिंदू धर्म पध्दतीने करण्यात येणार होता, परंतु समाजमाध्यमातून या विवाहाला लव्ह जिहाद म्हणण्यात आले.



    हा विवाह सोहळा थांबविण्यासाठी आडगांवकर यांना धमक्या देण्यात आल्या. रसिका अपंग असल्याने तिच्याशी कोणी लग्नास तयार झाले नसल्याचे आडगांवकर यांनी म्हटले होते. याबाबत सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष राजू घोडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. घोडे म्हणाले, कडू यांच्या विधानामुळे सुवर्णकार समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. 30 तारखे पर्यंत कडू यांनी माफी मागितली नाही तर आत्मदहन करण्यात येईल.

    मुलीच्या वडिलांना आम्ही समजावून सांगितले होते. त्यांनी विवाह सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पण बच्चू कडू यांच्यामुळे त्यांना बळ मिळाले. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. राज्यातील सर्व सुवर्णपदक बांधवांनी कडू यांचा लाळ्या फिती लावून निषेध करावा, असे घोडके यांनी सांगितले. या मुलीशी लग्न करण्यास कोणी तयार नव्हते या तिच्या वडिलांच्या दाव्यातही तथ्य नाही.समाजातील 100 मुले दाखविली असती, असेही घोडके यांनी म्हटले आहे.

    Suvarnakar Samaj aggressively warns Bachchu Kadu, a supporter of Love Jihad, warns of self-immolation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!

    NCP and Shiva Sena राष्ट्रवादीने पोस्टर वरती चढवून ठेवले “भावी मुख्यमंत्री”; तशीच ठाकरे बंधूंनी मारली पोस्टर वरती मिठी!!