• Download App
    लोकसभेतील सुरक्षाभंग - घुसखोरीचे पडसाद; नागपूर विधिमंडळात प्रेक्षक गॅलरी पासेस देणे स्थगित Suspension of issue of audience gallery passes in Nagpur Legislature

    लोकसभेतील सुरक्षाभंग – घुसखोरीचे पडसाद; नागपूर विधिमंडळात प्रेक्षक गॅलरी पासेस देणे स्थगित

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : संसदेचे हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरू असतानाच संसदेच्या सुरक्षभंग करून दोन तरुण लोकसभेत घुसल्याचा प्रकार उघड झाल्यावर बरोबर त्याचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळात उमटून विधिमंडळात प्रेक्षक गॅलरीचे पासेस देणे विधानसभा अध्यक्ष आणि विधानसभा परिषद विधान परिषद सभापतींनी स्थगित केले आहे. Suspension of issue of audience gallery passes in Nagpur Legislature

    संसदेचे हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाज सुरू असतानाच संसदेच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचा प्रकार समोर आला. लोकसभा सभागृहात कामकाजादरम्यान अमोल शिंदे आणि सागर हे दोन तरुण घुसल्याच्या प्रकार घडल्याने खळबळ उडाली. या प्रकारानंतर लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर आता नागपूर अधिवेशनातही गॅलरी पासेस देणे बंद केले आहे.

    दोन्ही सभागृहातील गॅलरी पासेसना बंदी केली आहे. दिल्लीमध्ये लोकसभा गॅलरीतून दोघांनी सभागृहात उडी मारल्याने विधिमंडळाने तात्काळ निर्णय घेतला आहे. आमदारांना दोन पासेस दिले जातील. तीन पास दिले जाणार नाहीत, अशी माहिती विधान परिषद उपासभापती डॉ निलम गोऱ्हे यांनी सभागृहात दिली.

    लोकसभेत काय घडले?

    संसदेचे हिवाळी अधिवेशनादरम्यान कामकाज सुरू असतानाच दोन तरुणांनी सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीतून टिअर गॅस कॅन घेऊन खासदार बसतात तेथे उड्या मारल्या. कामकाजा दरम्यान घुसखोरी केलेल्या दोघांपैकी एकाचे नाव सागर असल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही खासदाराच्या नावाने असलेल्या लोकसभा व्हिजीटर पासवर संसदेत आले होते. खासदार दानिश अली यांनी सांगितले की, हे दोघे म्हैसूर येथील भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या नवावर लोकसभा व्हिजीटर पास घेऊन आले होते.

    Suspension of issue of audience gallery passes in Nagpur Legislature

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला; क्रीडा क्षेत्रातल्या पवारांच्या सत्तेला फटका!!

    Devendra Fadnavis : ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो, तर महापाप करणारा महापौर, नागपुरात सीएम देवेंद्र फडणवीसांचे मिश्किल वक्तव्य

    Prakash Mahajan : राज ठाकरे वैफल्यग्रस्त झालेत, सत्तेसाठी कोणत्या थराला चालले, हिंदुत्व कुठे आहे? प्रकाश महाजनांची टीका