• Download App
    Sushilkumar Shinde गृहमंत्री म्हणून काश्मीरला गेल्यावर सुशील कुमारांची "फाटली

    Sushilkumar Shinde : गृहमंत्री म्हणून काश्मीरला गेल्यावर सुशील कुमारांची “फाटली”; एका वाक्यात यूपीए सरकारच्या धोरणाच्या चिंध्या!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मी जरी देशाचा गृहमंत्री होतो, तरी जम्मू काश्मीरमधील परिस्थिती एवढी खराब होती की गृहमंत्री म्हणून काश्मीरला जाताना माझी “फाटली” होती, या एका वाक्यात सुशीलकुमार शिंदे यांनी यूपीए सरकारच्या धोरणाच्या चिंध्या केल्या!! सुशील कुमार यांच्या एका वाक्यामुळे अख्खी काँग्रेस अडचणीत आली. भाजपला काँग्रेसवर कुरघोडी करायची संधी मिळाली. Sushilkumar Shinde Statement of JK

    सुशीलकुमार शिंदे यांन काश्मीरबद्दल केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले. सुशीलकुमार शिंदे यांनी लिहिलेल्या फाईव्ह डॅकेट्स इन पॉलिटिक्स या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. त्यांच्यासमोरच सुशीलकुमार शिंदे यांनी गृहमंत्री म्हणून काश्मीरमध्ये जाताना “फाटली” होती, असे वक्तव्य करून काँग्रेसला अडचणीत आणले.

    सुशीलकुमार शिंदे म्हणाले :

    मी गृहमंत्री असताना त्यापूर्वी मी विजय धर यांच्याकडे जायचो आणि त्यांच्याकडून सल्ला घ्यायचो, त्यांनी मला सल्ला दिला की सुशील, इकडे तिकडे भटकू नकोस. तू लाल चौकात जा आणि तिथे भाषण कर. काही लोकांना भेट आणि डल झील फिरायला जा. त्या सल्ल्यातून मला खूप प्रसिद्धी मिळाली आणि लोकांमध्ये संदेश गेला की, असा गृहमंत्री आहे जो न घाबरता जातो, पण माझी “फाटली” होती. पण मी कोणाला सांगू??

    मी हे तुम्हाला फक्त हसवण्यासाठी सांगितले, पण एक माजी पोलीस अधिकारी असे बोलू शकत नाही.


    धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; तंजावरचे मराठे पुस्तकाचे प्रकाशन


    काँग्रेसला ठोकायची भाजपला संधी

    सुशीलकुमार शिंदे यांनी एका वाक्यात यूपीए सरकारच्या धोरणाच्या चिंध्या केल्यानंतर भाजपला काँग्रेसला ठोकायची चांगली संधीच मिळाली. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यापूर्वी काश्मीर खोऱ्यात काय परिस्थिती होती हे सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते. शिंदे यांच्या वक्तव्याकडे काँग्रेसने लक्ष द्यावे, असा टोमणा भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी मारला.

    जम्मू-काश्मीरमध्ये आता दहशतवाद आणि फुटीरतावादाचं कंबरडं मोडलं आहे. आज लाल किल्ल्यापासूल लाल चौकापर्यंत देशाचा तिरंगा फडकतोय. दहशतवाद आणि दगडफेकीत प्रचंड घट झाली आहे. जिथे आधी गोळ्या झाडल्या जायच्या, आता तिथेच क्रिकेट खेळलं जाते, असा दावा भाजपने केला.

    कलम 370 हटवल्यानंतर किती बदल??

    काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादी आणि दगडफेकीच्या विरोधात तीव्र कारवाई करण्यात आली. काश्मीरमध्ये 2015 ते 2019 या कालावधीत दगडफेकीच्या 5063 घटनांची नोंद झाली होती. तर 2019-2023 दरम्यान केवळ 434 घटनांची नोंद झाली होती. त्याचवेळी, 2015-2019 दरम्यान 740 दहशतवादी मारले गेले, तर 2019-2023 दरम्यान 675 दहशतवादी मारले गेले होते. 2015-2019 दरम्यान 379 सुरक्षा कर्मचारी शहीद झाले आणि 2019-2023 मध्ये 146 जवान शहीद झाले.

    Sushilkumar Shinde Statement of JK

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस