• Download App
    सुशांत सिंग राजपूत - दिशा सालियन हत्येचा पुन्हा तपास : "मातोश्री"तील चौघांविरुद्ध ईडीची नोटीस तयार; नारायण राणेंचा गौप्यस्फोट!! Sushant Singh Rajput - Disha Salian murder case re-investigated

    सुशांत सिंग राजपूत – दिशा सालियन हत्येचा पुन्हा तपास : “मातोश्री”तील चौघांविरुद्ध ईडीची नोटीस तयार; नारायण राणेंचा गौप्यस्फोट!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना आणि भाजप मधला संघर्ष टोक गाठत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन या दोघांच्या हत्येप्रकरणी “मातोश्री”मधील चौघांविरुद्ध ईडीची नोटीस तयार असल्याचे ट्विट नारायण राणे यांनी केले आहे.Sushant Singh Rajput – Disha Salian murder case re-investigated

    शिवसेनेचे रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांना प्रत्युत्तर देताना नारायण राणे यांनी संबंधित ट्विट केले आहे. विनायक राऊत यांच्यासाठी आनंदाची बातमी… सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांची आत्महत्या नव्हे, तर हत्या झाली आहे. या संबंधीचा तपास पुन्हा लवकरच सुरू होईल. “मातोश्री”तील चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले, असे हे खोचक ट्विट आहे.


    सुशांतसिंगच्या हत्येत आदित्य ठाकरे यांचा सहभाग, पुरावे देऊनही अटकेची कारवाई झाली नसल्याचा नारायण राणे यांचा आरोप


    सुशांत सिंग राजपूत हत्याकांडाचा तपास केंद्रीय तपास संस्था करत आहेत तर दिशा सालियलन हिने आत्महत्या केल्याचे पोलिसांचे महाराष्ट्र पोलिसांचे म्हणणे आहे. यामध्ये अनेक संशयित महाराष्ट्रातले उच्चपदस्थ आहेत. यामध्ये अनेकदा बातम्यांमधून महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचेही नाव आले आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचे ट्विट महत्त्वाचे ठरते.

    नारायण राणे यांच्या ट्विट नंतर सोशल मीडियावर या संदर्भात कमेंट्स पाऊस पडला असून अनेकांनी आता महाराष्ट्रातले सत्ताधारी कुठल्या बिळात तोंड लपवायला जाणार?, असा सवाल केला आहे. शिवसेना आणि भाजप यांचा संघर्ष सध्या संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्या वादातून उफाळताना दिसतो आहे. त्या पलिकडे जाऊन आता नारायण राणे यांनी सुशांत सिंग रजपूत आणि दिशा सायली यांच्या प्रकरणावरून हत्या प्रकरणावरून ट्विट करून तसेच “मातोश्री”तील चौघांचा उल्लेख करून महाराष्ट्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

    Sushant Singh Rajput – Disha Salian murder case re-investigated

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ