• Download App
    स्मार्ट सिटी स्पर्धेत सुरत, इंदोर अव्वल; राज्यामध्ये उत्तर प्रदेशला प्रथम क्रमांक Surat, Indore top in Smart City competition; Uttar Pradesh ranks first in the state

    स्मार्ट सिटी स्पर्धेत सुरत, इंदोर अव्वल; राज्यामध्ये उत्तर प्रदेशला प्रथम क्रमांक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सुरत आणि इंदूरने स्मार्ट सिटी स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. १०० स्मार्ट सिटीत २०२०मध्ये या दोन शहरांनी चांगली कामगिरी केल्याबद्दल हे स्थान त्यांनी पटकावले. राज्य पातळीवरील कामगिरीत उत्तर प्रदेश अव्वल ठरले आहे.त्या पाठोपाठ मध्यप्रदेश आणि तामिळनाडूचा नंबर लागतो. Surat, Indore top in Smart City competition; Uttar Pradesh ranks first in the state

    स्मार्ट सिटी अभियानाला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल या पुरस्काराची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. स्मार्ट सिटी२०१९ स्पर्धेमध्ये सुरत हे पहिल्या क्रमांकाचे शहर ठरले होते.विशेष म्हणजे यंदा गृह आणि नगर विकास मंत्रालयाने शहरांबरोबरच राज्याचा समावेश या स्पर्धेत केला आहे.

    उत्तर प्रदेशने ७ नवीन स्मार्ट सिटी करण्यासाठी भरीव योगदान दिले. त्यामुळे त्याला राज्यात प्रथम क्रमांक दिला आहे. मेरठ, गाझियाबाद, अयोध्या, फिरोजाबाद, गोरखपूर, मथुरा- वृंदावन आणि सहरणपुर यांचा त्यात समावेश आहे. कोव्हिड इनोवेशन प्रकारात महाराष्ट्रातील कल्याण- डोंबविली आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी यांना संयुक्त विजेते घोषित केले आहे.

    स्मार्ट सिटी अभियानासाठी ५९२४ प्रकल्पासाठी १.७८ लाख कोटींची कंत्राटे दिली होती.५२३६ प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम १.४६ कोटींचे सोपविले होते. २६६५ प्रकल्प मार्गी लागले असून त्यासाठी ४५०८० कोटी खर्च झाले आहेत. आजपर्यंत ७० स्मार्ट सिटीची काम पूर्ण झाली असून इंटिग्रेटेड कमांड आणि कंट्रोल सेंटर सुद्धा सुरु आहेत. कोव्हिड मॅनेजमेंटसाठी ती सेंटर वॉर रुम म्हणून अन्य १०० स्मार्ट सिटीसोबत कार्यरत आहेत. ३१० स्मार्ट रोड तयार केले आहेत. यासारखे आणखी४५९ प्रकल्प रराबविले जात असून त्या पैकी काही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.

    पिंपरी-चिंचवड शहराला ४ स्टार रेटिंग

    मंत्रालयाने क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क (सीएससीएएफ) २.० या विषयावर अहवाल सादर केला. ज्यामध्ये १२ शहरांनी भाग घेतलेल्या पाच विषयासंबंधी क्षेत्रातील शहरांच्या सध्याच्या कामगिरीचे मूल्यांकन केले. सुरत, इंदूर, अहमदाबाद, पुणे, विजयवाडा, राजकोट, विशाखापट्टणम, पिंपरी-चिंचवड आणि वडोदरा या नऊ शहरांना ‘४ स्टार रेटिंग’ देण्यात आली आहेत.

    Surat, Indore top in Smart City competition; Uttar Pradesh ranks first in the state

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस