• Download App
    Suraj Chavan छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाणांना माफी मागायची उपरती; पण अजितदादा करणार का कठोर कारवाई??

    छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाणांना माफी मागायची उपरती; पण अजितदादा करणार का कठोर कारवाई??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी छावा संघटनेचे कार्यकर्ते विजय घाडगे पाटील यांना मारहाण केली. तो मुद्दा राज्यभर पेटल्यानंतर सुरज चव्हाण यांना माफी मागायची उपरती झाली. पण या सगळ्या प्रकारात अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबरच फडणवीस सरकारची बदनामी झाली. त्यामुळे अजित पवार‌ आता सुरज चव्हाण यांच्यावर कुठली कठोर कारवाई करणार का??, असा सवाल तयार झाला.

    याच दरम्यान सुरज चव्हाण यांच्या विरोधात लातूरच्या विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांची दोन विशेष पथके चव्हाण यांच्या शोधासाठी रवाना झाल्याची बातमी मराठी माध्यमांनी दिली.



    विधिमंडळात मोबाईलवर रम्मी खेळण्यात मग्न झालेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलन केलेल्या विजय घाडगे पाटलांना सुरज चव्हाण यांनी मारहाण केली. या मारहाणीचे नंतर त्यांनी समर्थन केले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर सुरज चव्हाण यांना माफी मागायची उपरती झाली. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर माफी मागणारा व्हिडिओ शेअर केला. यात त्यांनी छावा संघटना आपली बंधू असल्याचे सांगून संबंधित वादाला घरगुती वळण द्यायचा प्रयत्न केला.

    पण सुरज चव्हाण यांच्या कृत्याचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले. त्यामुळे सुनील तटकरे यांनी आपल्या मराठवाडा दौऱ्यातून सुरज चव्हाण यांना वगळून टाकले. त्या पाठोपाठ अजित पवारांनी सुरज चव्हाण यांना ताबडतोब मुंबईला बोलवून घेतल्याची देखील बातमी आली. या पार्श्वभूमीवर अजित पवार आपल्याच पक्षातून होणारी दादागिरी कशी रोखणार??, सुरज चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई काय करणार??, असा सवाल तयार झाला.

    Ajit Pawar must strongly act against NCP huglihooliganism

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Nitin Gadkari : आर्थिकदृष्ट्या सक्षम देशांकडून सध्या गुंडगिरी, ट्रम्प टॅरिफवरून नितीन गडकरी यांचा टोला

    Prakash Ambedkar : किती खोटं बोलावं यालाही मर्यादा, प्रकाश आंबेडकर यांची शरद पवारांवर टीका

    Laxman Hake : जरांगे नावाच्या बबड्याला रसद पुरवणारे शरद पवार इच्छाधारी नागाप्रमाणे वेटोळे घालून बसलेत लक्ष्मण हाके यांची टीका