• Download App
    |Supriyatai, only scammers "understand" before raids !!; The three scams will be sorted out next week; Torah of Kirit Somaiya

    सुप्रियाताई, घोटाळेबाजांनाच छापे आधी “समजतात”!!; पुढच्या आठवड्यात तिघांचे घोटाळे मार्गी लागणार; किरीट सोमय्यांचा टोला

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे बोलतात ते खरेच आहे. घोटाळेबाजांनाच आधीच समजले पाहिजे, आपल्यावर छापे कधी पडणार आहेत ते…!!, असा टोला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी लगावला आहे.Supriyatai, only scammers “understand” before raids !!; The three scams will be sorted out next week; Torah of Kirit Somaiya

    ईडी, सीबीआय या केंद्रीय तपास संस्था सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचा अंकित असल्यासारखे वागतात. कुठे छापे पडणार हे भाजप नेत्यांना आधीच समजते, असा दावा सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत बोलताना केला होता. सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रियाताई, आजच सांगतो पुढच्या आठवड्यात आणखी तिघांचे घोटाळे मार्गी लागणार आहेत, असे ते म्हणाले. त्याच वेळी त्यांनी सुप्रिया सुळे बरोबर बोलतात. कारण घोटाळेबाजांना आधी समजते,



    आपल्यावर छापे पडणार आहेत ते!!, असा टोला त्यांनी लगावला आहे.दापोली तालुक्यीतल मुरुड येथे समुद्रकिनारी अनिल परब यांचे साई रिसॉर्ट पाडायला आलेल्या कार्यकर्त्याशी संवाद साधताना सोमय्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.

    काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

    “तुम्ही म्हणता सीबीआय, ईडी, आयकर या स्वतंत्र तपास संस्था आहेत. या तपास संस्था स्वतंत्र आहेत तर मग आम्हाला ट्विटरवर कोणावर धाड पडणार हे ४-५ दिवस आधीच कसे समजते? एखादा नेता १५ दिवसात तुरुंगात जाणार असं बोलणारे नेते भविष्य सांगणारे आहेत का? कोण आहेत ते, त्यांना कोणावर छापा पडणार हे कसं माहिती होतं?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.

    “हे सर्व ट्विटरवर येतं. मी याबाबत तारखेनुसार पुरावे सादर करू शकते. याचे दोनच अर्थ निघतात. तुम्ही एकतर मान्य करा की ईडी, सीबीआय या सर्व तपास संस्था सत्तेत असलेल्या लोकांकडून चालवल्या जातात. खरं बोला, अमित शाह खरं बोलतात. मला वाटतं मी फक्त त्यांनाच याबाबत विचारायला हवं. सरकारमध्ये इतर कोण खरं बोलतं याबाबत माहिती नाही. अमित शाह तर नक्की खरं बोलतात,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी भाजपाला टोला लगावला.

    त्यावर आता किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे किरीट सोमय्यांना कसं कळतं कारवाई होणार असं विचारतात. सुप्रियाताई, आजचं सांगतो पुढच्या आठवड्यात तिघांवर कारवाई होणार आहे. ज्यांनी घोटाळे केले आहेत त्यांनाच आधी छापे कळायला पाहिजेत. पुढच्या आठवड्यात तिघांचे घोटाळे मार्गी लागणार आहेत, असे किरीट सोमय्या म्हणाले.

    Supriyatai, only scammers “understand” before raids !!; The three scams will be sorted out next week; Torah of Kirit Somaiya

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!