प्रतिनिधी
पुणे : पुण्यात एका कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या साडीने पेट घेतला. सुदैवाने कार्यकर्त्यांच्या ही गोष्ट वेळीच लक्षात आल्याने आग विझवली. त्यांना कोणतीही इजा झाली नाही. Supriya Sule’s sari caught fire at an event in Pune; A disaster was averted by chance
हिंजवडीत एका कराटे क्लासचे उद्घाटन करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी दीपप्रज्वलन करून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पाहार अर्पण करत होत्या. तिथेच तेवता दिवा होता. त्या दिव्याचा स्पर्श सुप्रिया सुळेंच्या साडीला झाला.
त्यामुळे साडीने पेट घेतला. हे उपस्थितांच्या लक्षात आल्यावर साडीला लागलेली आग लगेच विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. यामध्ये सुप्रिया सुळे यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाल्या परंतु त्यांनी इतरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे आहे.
Supriya Sule’s sari caught fire at an event in Pune; A disaster was averted by chance
महत्वाच्या बातम्या
- Remote Voting Machine : निवडणूक आयोगाचा सर्व राजकीय पक्षांसाठी उद्या प्रत्यक्ष प्रयोग; का आणि कसे होईल रिमोट मतदान??
- Indian Army Recruitment 2023: भारतीय सैन्यात नोकरीची संधी; करा अर्ज
- कौशल्य विकासच्या रोजगार मेळाव्यात 14 हजार 90 जागांसाठी मुलाखती, लवकरच नोकरीची संधी
- शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची; १७ जानेवारीला सुनावणी, पण फैसला कधी आणि कशाच्या आधारावर??; वाचा तपशील