• Download App
    supriya sule पंकजा मुंडेंनी सुसंस्कृतपणा दाखवला, पण धनंजय मुंडेंनी...; सुप्रिया सुळे यांनी दाखवला "पवार संस्कारित" आणि "भाजप संस्कारित" नेत्यांमधला फरक!!

    पंकजा मुंडेंनी सुसंस्कृतपणा दाखवला, पण धनंजय मुंडेंनी…; सुप्रिया सुळे यांनी दाखवला “पवार संस्कारित” आणि “भाजप संस्कारित” नेत्यांमधला फरक!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची हात जोडून माफी मागत पंकजा मुंडे यांनी सुसंस्कृतपणा दाखवला. परंतु, धनंजय मुंडे यांना वाल्मीक कराडचे पीए भेटायला जात होते. त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला नाही, असे सुरेश धसच म्हणाले. यातून धनंजय मुंडे हेच मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) खासदार सुप्रिया सुळे यांनी “पवार संस्कारित” नेते आणि “भाजप संस्कारित” नेते यांच्यातला फरक दाखवून दिला. पवार संस्कारित माजी मंत्री धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात सह आरोपी करण्याची मागणी यांनी पुन्हा लावून धरली.

    धनंजय मुंडे यांच्यावर मी बोलावे अशी त्यांची लायकी नाही, असे शरद पवारांनी निवडणुकीपूर्वी वक्तव्य केले होते. ते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा व्हायरल झाले. धनंजय मुंडे यांना कोणकोणत्या प्रकरणातून आम्ही बाहेर काढले हे सांगितले तर त्यांना महाराष्ट्रात फिरणे मुश्किल होईल, असे पवार म्हणाले होते. माझ्या पक्षातल्या बऱ्याच नेत्यांचा विरोध असताना केवळ एक सामान्य कुटुंबातला तरुण म्हणून धनंजय मुंडे यांना संधी दिली आणि तेच माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करत आहेत याची आठवण पवारांनी त्यावेळी करून दिली होती.

    धनंजय मुंडे नावाची “प्रवृत्ती” पवारांनीच “पोसली” होती, त्यांनीच मुंडे यांच्यावर राजकीय संस्कार केले होते, याची एक प्रकारे पवारांनी स्वतःच्या तोंडाने दिलेली ती कबुली होती. सुप्रिया सुळे यांनी याच पवार संस्कारांचे आज वाभाडे काढले. धनंजय मुंडे यांच्याकडे नैतिकता नसल्याचा त्यांनी पुनरुचार केला पण पंकजा मुंडे या सुसंस्कृत नेत्या असल्याचे सर्टिफिकेट त्यांनी देऊन टाकले.

    supriya sule target dhananjay munde

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरातांची आयोगावर टीका- मतदार यादीतील दुबार नावांवरून आक्रमक, हा पोरखेळ!

    Election Commission : आयोगाने केले विरोधकांच्या शंकांचे निरसन, संभाव्य दुबार मतदारांसह कास्ट व्हॅलिडिटीवर काय म्हटले, वाचा सविस्तर

    Sandeep Deshpande : बोगस मतदार आढळल्यास ‘मनसे स्टाइल’ने दणका देणार; संदीप देशपांडे म्हणाले- पुरावे देऊनही आयोगाकडून कारवाई नाही