विशेष प्रतिनिधी
नागपूर : देवेंद्र फडणवीसांचा अजितदादांना दणका पण सुप्रिया सुळे यांना नवाब मलिकांचा कळवळा, असे आजच्या नवा मालिकांच्या राजकारणावरून म्हणावे लागेल. कारण नवाब मलिक नागपूर अधिवेशनाला येऊन सत्ताधारी बाकावर शेवटी बसले. त्यावरून सुरुवातीला महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असे घामासान झाले, पण नंतर त्या घामासानाचे रूपांतर महायुतीतल्या वर्चस्वात झाले. Supriya sule showed sympathy for nawab malik
नवाब मलिक महायुतीत नकोत, असे परखड पत्र लिहून देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात महायुतीत भाजपच “खरा दादा” असल्याचे सिद्ध केले पण यामुळे सुप्रिया सुळे यांना नवाब मलिकांविषयी कळवळा व्यक्त करण्याची संधी मिळाली.
नवाब मलिक आपले भाऊ आहेत त्यांच्याविरुद्धचे देशद्रोहाचे आरोप खोटे आहेत. ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाहीत, तर ते महाराष्ट्राचे नेते आहेत. भाजप विरोधात ते ताकदीने लढले. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्यांचा सन्मानच होईल. माझ्यासाठी तर त्यांच्या कुटुंबातले भाऊ आहेत. त्यांच्यावरचे देशद्रोहाचे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या संदर्भात काही पत्र लिहिले असेल, तर महाराष्ट्राचे राजकारण खालच्या पातळीवर गेले असे म्हणावे लागेल असा दावा करून सुप्रिया सुळे यांनी नवाब मलिकांविषयी कळवळा दाखविला.
नवाब मलिक यांनी आज विधिमंडळ अधिवेशनात सहभाग घेतला. ते शांतपणे येऊन सत्ताधारी बाकांवर पाठीमागे बसले. अजित पवार यांनी नवाब मलिकांच्या जामीनवरच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते, ते लक्षात घेऊनच नवाब मलिक अजित पवारांच्या बाजूने जाऊन बसले, पण सायंकाळपर्यंत या घटनेचे फार मोठे राजकारण होऊन भाजपचा दणका अजित पवारांनाच सहन करावा लागला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना नवाब मलिकांविषयी कळवळा दाखविण्याची संधी मिळाली.
Supriya sule showed sympathy for nawab malik
महत्वाच्या बातम्या
- मिचाँग चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीवर धडकून उत्तरेकडे सरकले; 100 हून अधिक ट्रेन, 50 उड्डाणे रद्द; चेन्नईत 12 जणांचा मृत्यू
- रेवंत रेड्डी होणार तेलंगणाचे मुख्यमंत्री; 7 डिसेंबरला शपथविधी, राहुल गांधींनी केले शिक्कामोर्तब
- सनातन धर्माला शिव्या देण्यात मोदी विरोधक दंग; भाजपची पुरती “काँग्रेस” करण्याचा त्यांनी बांधलाय चंग!!
- GOOD News : नवीन वर्षात शेतकऱ्यांची होणार चांदी, बँक खात्यात जमा होणार 5000 रुपये!