विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स आढळून येत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करताहेत??, असा बोचरा सवाल करून शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे – फडणवीस सरकारला जरूर डिवचले, पण त्याचवेळी त्यांनी ड्रग्स प्रकरणाली नावे फडणवीस जाहीर करणार होते. ती का केली नाहीत??, असा पुढचा सवाल करून आपल्याच मित्र पक्षाला अडचणीत आणले आहे. Supriya sule demands drugs connection be explained, but she is exposing whom??
ड्रग्स माफिया ललित पाटीलला अटक झाली. त्याच्या पाठोपाठ त्याच्या दोन मैत्रिणी आत गेल्या आणि त्याचा ड्रग्स डीलर शेख अन्सारी देखील आत मध्ये गेला. पोलिसांनी ललित पाटीलला नाशिक मध्ये आणून त्याच्या मालमत्तांची झाडाझडती चालवली. त्यातून ललित पाटील आणि ठाकरे शिवसेना यांचे लागेबांधही उघड झाले. सुषमा अंधारे तर आपण घाबरणार नाही. मागे हटणार नाही, असे सांगत भर पत्रकार परिषदेत रडल्या. संजय राऊत यांनी नाशिक मध्ये येऊन ड्रग्स विरोधात एक मोर्चा काढला.
या सर्व कारवाईच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी दोन चार वाक्ये वगळता काहीही सांगितले नाही. या प्रकरणात बरेच काही धागेदोरे आहेत पण ते मी आत्ता सांगणार नाही एवढेच ते म्हणाले होते.
पण त्यानंतर आज 22 ऑक्टोबरला छत्रपती संभाजी नगर मध्ये एका रसायन कारखान्यावर गुजरात पोलिसांनी छापा घालून 300 किलो ड्रग्स जप्त केली. यात कोकेन, केटामाइन आणि एमडी ड्रग्सचा समावेश होता. या सर्व ड्रग्सची किंमत 500 कोटी रुपये भरली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी संतापून देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला. महाराष्ट्रात एवढी मोठ्या प्रमाणावर ड्रग्स पकडली जात आहेत. हा महाराष्ट्राच्या तरुणाईचा प्रश्न आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करत आहेत?? ते ड्रग्स प्रकरणातली नावे जाहीर करणार होते, ती त्यांनी अजून का केली नाहीत??, असा सवाल केला.
महाराष्ट्रातल्या ड्रग्स प्रकरणातले ललित पाटील आणि बाकीचे लागेबांधे उघड होत असताना सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर ताशेरे जरूर झोडले, पण त्या ड्रग्स प्रकरणातली नावे जाहीर करा, असे सांगून नेमक्या कोणाला “एक्स्पोज” करत आहेत असा असा सवाल तयार झाला आहे.
Supriya sule demands drugs connection be explained, but she is exposing whom??
महत्वाच्या बातम्या
- मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या दिशेने; 25 ऑक्टोबर पासूनचा जाहीर केला कार्यक्रम!!
- काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याविरोधात भाजपाची निवडणूक आयुक्तांकडे तक्रार
- शुद्ध मनाच्या संधीचे सोने, 10 % EWS आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ!!
- महुआ मोईत्रा वादापासून TMCने राखले अंतर; म्हटले- जो वादात अडकला, त्यानेच बोलावे; निशिकांत दुबे यांची लोकपालकडे तक्रार