विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिवसेनेला भाजपपासून तोडून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार बनविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावेळी अकेला देवेंद्र क्या करेगा??, असा खोचक सवाल केला होता. पण आता त्याच सुप्रिया सुळे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने केलेल्या कथित अन्यायाचे “दुःख” झाले आहे!! Supriya Sule comes to BJP Fadnavis
देवेंद्र फडणवीस यांनी 105 आमदार निवडून आणले, पण भाजपने त्यांच्यावर अन्याय केला. त्यांना मुख्यमंत्री करण्याऐवजी उपमुख्यमंत्री केले. ते उपमुख्यमंत्री पद सुद्धा वाटून दिले आणि पालकमंत्री नेमण्याचे अधिकारही फडणवीस यांना ठेवले नाहीत, याचे मला दुःख होते. हे सगळे वेदनादायी आहेत, असे खोचक उदगार सुप्रिया सुळे यांनी काढले.
याच सुप्रिया सुळे यांनी अकेला देवेंद्र क्या करेगा असे विचारून त्यांना हिणवले होते. पण अडीच वर्षांनंतर शरद पवारांच्या नियंत्रणाखालचे ठाकरे – पवार सरकार गेले. अजित पवार तिसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात आले. पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजपच्या नेतृत्वाने त्यांना तीन महिने तंगविले. स्वतःच्या अटी शर्तींवर अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले.
या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस गमावली आणि सुप्रिया सुळे यांना मात्र भाजपने देवेंद्र फडणवीसांवर केलेला “अन्याय” आठवला आणि त्यांनी फडणवीसांविषयी आता सहानुभूती व्यक्त केली. ती सहानुभूती व्यक्त करताना देखील मूळचा खोचक स्वभाव त्या विसरल्या नाहीत.
Supriya Sule comes to BJP Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- बंगळुरूमध्ये भीषण दुर्घटना, फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू
- Earthquake : अफगाणिस्तानमध्ये ३० मिनिटांत ३ शक्तिशाली भूकंप, १४ मृत्यू, ७८ जखमी
- दहशतवादी रिझवान अश्रफचे ‘सपा’ नेत्याशी आढळले कनेक्शन, तपास यंत्रणांनी छापेमारी सुरू केली
- Asian Games 2023 : भारताने बॅडमिंटनमध्ये रचला इतिहास, आशियाई क्रीडा स्पर्धेत प्रथमच जिंकले सुवर्णपदक