विशेष प्रतिनिधी
मुबंई : आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नव्हते. तर व्हॉट्स अँप चाटच्या आधारे एखाद्या व्यक्तीला ड्रग पेडलिंग आणि ट्रॅफिकिंग या सारख्या गंभीर आरोपामध्ये गुन्हेगार म्हणून अटक करणे कितपत योग्य आहे? अशा अनेक प्रश्नांनी आर्यन खानच्या केस मधील गुंता वाढवला आहे. यादरम्यान आर्यन खानच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्याची मागणी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करून केली आहे. मुंबईमधील एनसीबीच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी देखील या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
Supreme Court should intervene in Aryan Khan’s case, violate fundamental rights: Shiv Sena leader Kishor Tiwari
संविधानाच्या अनुच्छेद 32 अन्वये एक याचिका देत शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी भारताचे सरन्यायाधीश एन वी रमण यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे विनंती देखील केली आहे की, आर्यनच्या मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाची चौकशी करण्याचे आदेश कोर्टाकडून जारी केले जावेत. एनसीबीच्या कारवायांवर आरोप करताना या निवेदनात म्हटले आहे की, मागील दोन वर्षांपासून एनसीबी पक्षपाती दृष्टिकोन स्वीकारून चित्रपट क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती, मॉडेल आणि सेलिब्रेटींना जाणूनबुजून टार्गेट करताना दिसून येत आहेत. या सर्वांमध्ये मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाची चौकशी करणे गरजेचे आहे.
तर विशेष एनडीपीएस कोर्टाने सार्वजनिक सुट्टीचे कारण देत आर्यन आणि इतर आरोपींची जामीन याचिका 20 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली होती. यामुळे आर्यन खानला 17 रात्री बेकायदेशीररीत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. हे राज्य घटनेत अंतर्भूत केलेल्या जीवन आणि स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे पूर्ण उल्लंघन आहे. असे तिवारी यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान आर्यनच्या जामिनावर बुधवारी सुनावणी होणार आहे. आर्यनच्या जामिनावर सुनावणी विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामीनावरील निर्णय राखून ठेवला होता.
Supreme Court should intervene in Aryan Khan’s case, violate fundamental rights: Shiv Sena leader Kishor Tiwari
महत्त्वाच्या बातम्या
- लाईफ स्किल्स : एक मिनिटाचा स्ट्रेच व्यायामप्रकारही शरीरासाठी मोलाचा
- हर्बल तंबाखू लागवडीसाठी शेतकऱ्यांना परवानगी द्या ; सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पाठविले पत्र
- T20 World Cup : विराट कोहली म्हणाला – ‘वर्ल्डकप स्पर्धेत मी रोहितसोबत ओपनिंगला येणार नाही’…काय आहे कारण?
- पुण्यात उपायुक्ताला १ लाख ९० हजारांची लाच घेताना अटक; लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई