वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ठाकरे – पवार सरकारला अखेर सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेचा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावत राज्यपालांचे बहुमत सिद्ध करण्याचे आदेश स्थगित करण्याला पूर्ण नकार दिला. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा दिला नाही, तर उद्या बहुमत सिद्ध करण्यासाठी विधानसभा सदनाची यावेच लागणार आहे. Supreme court rejects Shivsena plea
सुमारे तीन तास शिवसेनेच्या अर्जावर सुप्रीम कोर्टाची युक्तिवाद करण्यात आला. शिवसेनेचे काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी बहुमत चाचणी टाळण्याचा भरपूर प्रयत्न केला. राज्यपालांवर ते पवित्र गाय आहेत का असा आक्षेप घेतला. विविध खटल्यांचा उल्लेख करून राज्यपालांनी कसे पक्षपाती धोरण अवलंबले आहे, याचे वर्णन केले. परंतु, सुप्रीम कोर्टाने शिवसेनेचे सर्व युक्तिवाद फेटाळून उद्याची शक्ती परीक्षेची अर्थातच बहुमत चाचणी टाळता येणार नाही, असा फैसला दिला आहे.
40 आमदारांचे मृतदेह परत येतील; संजय राऊतांच्या वक्तव्याचे सुप्रीम कोर्टात वाभाडे!! बहुमत गमावल्याची त्यांचीच कबुली!!
– संजय राऊत यांचे वक्तव्ये भोवली
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संजय राऊत यांनी केलेल्या विविध वक्तव्यांचा हवाला सुप्रीम कोर्टात राज्यपालांचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिला.
शिवसेनेचे 40 आमदार गुवाहाटीला गेलेत. तिथे कामाख्या मंदिर आहे. तिला रेडे बळी देण्याची प्रथा आहे. आम्ही इकडनं 40 रेडे तिकडे पाठवलेत. तिथेच त्यांचे बळी द्या. त्यांचे मृतदेह इकडे परत आणू, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते.
त्या वक्तव्याचाच हवाला देऊन तुषार मेहता यांनी राज्यपालांची बाजू सुप्रीम कोर्टात ना मांडली संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून जर राज्यपालांनी आमदारांच्या सुरक्षा व्यवस्थेविषयी काही भाष्य केले असेल तर ते गैर कसे मानता येईल?, असा सवाल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात केला.
किंबहुना संजय राऊत यांच्या या वक्तव्याची दखल वेगळ्या प्रकारे देखील तुषार मेहता यांनी घेतली. 40 आमदार गुवाहाटीला गेल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी करणे याचा अर्थ संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे गट अल्पमतात असल्याची कबुलीच देणे आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याचीही कबुली त्यांनी दिली आहे, याकडे तुषार मेहता यांनी लक्ष वेधले आहे शिवसेनेत शिंदे गट बहुमतात आहे. यासाठी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा हाच पुरावा गृहीत धरावा, असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात केला आहे.
– शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद
तर इथे फक्त महाविकास आघाडी सरकार अल्पमतात नाही तर शिवसेना नावाचा पक्षच विधिमंडळात अल्पमतात आला आहे कारण एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे शिवसेना शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले 39 आमदार आहेत असा युक्तिवाद एकनाथ शिंदे गटाचे वकील कौल यांनी केला.
Supreme court rejects Shivsena plea
महत्वाच्या बातम्या