वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्देश द्यावेत, शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती, पण ती सुनावणी आता सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली असून पवार गटाला 13 ऑक्टोबरची सुनावणीसाठी तारीख दिली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगावर सुप्रीम कोर्टाचा दबाव आणण्याच्या पवार गटाच्या प्रयत्नांना ब्रेक लागला आहे. Supreme Court posts for hearing on October 13 plea of Sharad Pawar faction of Nationalist Congress Party
राष्ट्रवादी खरी कोणाची शरदनिष्ठांची की अजितनिष्ठांची?? याचा निर्णय निवडणूक आयोगात लागणे अपेक्षित आहे. पण त्यापूर्वी शरदनिष्ठ राष्ट्रवादीतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह 9 मंत्र्यांच्या आमदारकीच्या निलंबनासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. यातून निवडणूक आयोगावर वैधानिक दबाव आणण्याचा शरदनिष्ठ राष्ट्रवादीचा प्रयत्न होता. सुप्रीम कोर्टाने शरदनिष्ठ राष्ट्रवादीची याचिका दाखल करून घेतली. त्याची सुनावणी आज 9 ऑक्टोबर 2023 रोजी ठेवली होती. पण आता ही सुनावणी 13 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे.
पण निवडणूक आयोगात मात्र आज सायंकाळी 4.00 वाजताच पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टातल्या याचिकेतून निवडणूक आयोगावर वैधानिक दबाव आणण्याचा पवारनिष्ठांच्या प्रयत्नांना ब्रेक लागला. निवडणूक आयोगात शरदनिष्ठ आणि अजितनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वकिलांचे युक्तिवाद होतील आणि कदाचित निवडणूक आयोग आजच निर्णय देऊन मोकळा होईल.
Supreme Court posts for hearing on October 13 plea of Sharad Pawar faction of Nationalist Congress Party
महत्वाच्या बातम्या
- द फोकस एक्सप्लेनर : इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या वादाचे मूळ काय? कसे मजबूत झाले ज्यू? वाचा सविस्तर
- नैनितालमध्ये भीषण अपघात, ३२ प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळी , १४ जण बेपत्ता
- अडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून??; कराडातच नाही, तर बारामतीत कुठून??
- ५०० वर्षांनंतर रामजन्मभूमी परत घेतली, तर ‘सिंध’ का नाही? मुख्यमंत्री योगी यांचे मोठे विधान!