• Download App
    न्यूजक्लिक फॉरेन फंडिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस, पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला Supreme Court notice to Delhi Police in Newsclick foreign funding case, next hearing on October 30

    न्यूजक्लिक फॉरेन फंडिंगप्रकरणी सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस, पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : न्यूजक्लिकचे संस्थापक आणि संपादक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांच्या अटकेबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठाने याप्रकरणी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. Supreme Court notice to Delhi Police in Newsclick foreign funding case, next hearing on October 30

    वास्तविक, प्रबीर आणि अमित यांनी 16 ऑक्टोबरला त्यांच्या अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यापूर्वी, 10 ऑक्टोबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने दोघांनाही 10 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, जी शुक्रवारी 20 ऑक्टोबर रोजी संपत आहे.

    पुरकायस्थ आणि अमित यांच्यावर चीनशी संबंधित कंपन्या आणि संस्थांकडून निधी घेऊन चिनी प्रचाराचा प्रसार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अटकेबाबत सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी 30 ऑक्टोबरला होणार आहे.

    सीबीआयसह 5 एजन्सींकडून तपास

    सीबीआयसह पाच एजन्सी न्यूजक्लिकच्या विरोधात तपास करत आहेत. प्रथम दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एफआयआर नोंदवला होता. त्याआधी दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभाग या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी करत होते. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने न्यूजक्लिक विरुद्ध फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    Supreme Court notice to Delhi Police in Newsclick foreign funding case, next hearing on October 30

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ