• Download App
    फक्त वैद्यकीय जामिनावर बाहेर आलेले नवाब मलिक "फिट" होऊन विधिमंडळ अधिवेशनात कसे??, ते तर पुन्हा तुरुंगात हवेत; सोशल मीडियात चर्चा!! Supreme Court granted bail to nawaab Malik only on medical grounds

    फक्त वैद्यकीय जामिनावर बाहेर आलेले नवाब मलिक “फिट” होऊन विधिमंडळ अधिवेशनात कसे??, ते तर पुन्हा तुरुंगात हवेत; सोशल मीडियात चर्चा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : फक्त वैद्यकीय जामिनावर बाहेर आलेले नवाब मलिक उपचार घेऊन”फिट” झाले असतील, तर ते नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात हजर कसे??, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ऑर्थर रोड तुरुंगात असायला हवेत अशी चर्चा सोशल मीडिया सुरू झाली आहे. Supreme Court granted bail to nawaab Malik only on medical grounds

    नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने फक्त वैद्यकीय कारणांसाठीच जामीन मंजूर केला. त्यानंतर त्यांच्यावर वेगवेगळ्या विकारांसाठी उपचार झाले त्यातून ते बरे होऊन मुंबई ते नागपूर असा प्रवास करत विधिमंडळ अधिवेशनात पोहोचले. याचा अर्थ नवाब मलिकांची तब्येत आता “क्रिटिकल” राहिलेली नाही, मग सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त त्यांचा वैद्यकीय जामीन रद्द होऊन पुन्हा ते पुन्हा ऑर्थर रोड रोड तुरुंगातच दाखल व्हायला हवेत, अशी चर्चा सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

    भाजपचे मुंबईतले नेते मोहित कंबोज यांनी तर सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आपल्या सोशल मीडिया हँडलवर ट्विट करून नवाब मलिक आता “फिट” झाले आहेत. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज नाही. त्यांना ताबडतोब तुरुंगात पाठवून द्या, अशी मागणी केली आहे.

    सुप्रीम कोर्टाच्या आदेशातच हे ठळकपणे नमूद केले आहे की, अर्जदाराच्या गरजेनुसार वैद्यकीय उपचारांसाठीच त्याला वैद्यकीय जामीन सुप्रीम कोर्ट मंजूर करत आहे. अर्जदाराच्या केसच्या बाकीच्या कुठल्याही मेरिट वर सुप्रीम कोर्टाने भाष्य केलेले नाही. वैद्यकीय जामीन मंजूर करून 10 आठवड्यांनी पुन्हा ही केस सुनावणीला आणा, असे असे सुप्रीम कोर्टाच्या आदेशात स्पष्ट नमूद आहे.

    अशा स्थितीत नवाब मलिक हे वैद्यकीय जामिनावर बाहेर येऊन वैद्यकीय उपचार घेऊन बरे झाले असतील आणि ते मुंबई ते नागपूर असा प्रवास करून विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थित राहणे इतपत “फिट” असतील, तर त्यांची रवानगी पुन्हा तुरुंगातच केली पाहिजे, अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली आहे. त्यावर अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    Supreme Court granted bail to nawaab Malik only on medical grounds

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस