• Download App
    विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ; शिवसेना आमदारांच्या पात्र पात्रतेचा निर्णय 10 जानेवारीला!! Supreme Court extension of term to Assembly Speaker

    विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ; शिवसेना आमदारांच्या पात्र पात्रतेचा निर्णय 10 जानेवारीला!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आता 10 जानेवारी 2024 ला निकाल जाहीर होणार आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 31 डिसेंबर 2023 पर्यंत या प्रकरणावर निकाल जाहीर करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणी सुनावणी घेतली. Supreme Court extension of term to Assembly Speaker

    विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटांचा युक्तिवाद ऐकून दोन्ही पक्षांची बाजू समजून घेतली. दोन्ही गटांच्या आमदारांची उलटसाक्ष देखील नोंदविली. त्यानंतर आता सुनावणी अंतिम टप्प्यावर आली आहे. असे असताना विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला. या प्रकरणावर निकाल जाहीर करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली. सुप्रीम कोर्टाने तीन आठवडे न देता 10 दिवसांची मुदतवाढ दिली.

    विधानसभा अध्यक्षांच्या तीन आठवड्यांच्या मुदतवाढच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने तेवढी मुदतवाढ देऊ शकत नाही, असे स्पष्ट सांगितले. पण 10 जानेवारीपर्यंत अंतिम निकाल जाहीर व्हायला हवा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.

    राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले?

    राहुल नार्वेकर यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांदरम्यान महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर 10 जानेवारी 2024 रोजी निकाल घोषित करणार आहे. आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल देणार, हे देशासाठी उदाहरण असेल, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली.

    Supreme Court extension of term to Assembly Speaker

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू बसले अजूनही घरी; एकनाथ शिंदे यांची मात्र नाशिक पाठोपाठ विदर्भात मुशाफिरी!!

    पोस्टर वरच्या मुख्यमंत्र्यांची पुरती झाली “शोभा”; स्थानिक आणि किरकोळ निवडणुकांमध्ये निघाली हवा!!

    अकोट, अंबरनाथ मध्ये सत्तेचे समीकरण जुळले; भाजपचे AIMIM आणि काँग्रेस विरोधातले सोवळे सुद्धा नाही सुटले!!