• Download App
    मनोज जरांगे समर्थकांनी दवाखान्यात घुसून डॉक्टरला काळे फासले!!|Supporters of Manoj Jarange broke into the hospital and blackmailed the doctor!!

    मनोज जरांगे समर्थकांनी दवाखान्यात घुसून डॉक्टरला काळे फासले!!

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजी नगर : मनोज जरांगे समर्थकांनी दवाखान्यात घुसून एका डॉक्टरला काळे फासले. अंतरवाली सराटी मध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध करणाऱ्या डॉ. रमेश तारक यांच्या दवाखान्यात हा प्रकार घडला.Supporters of Manoj Jarange broke into the hospital and blackmailed the doctor!!

    मनोज जरांगे अंतरवली सराटी गावात उपोषण करणार होते, परंतु ग्रामस्थांनी त्यांच्या उपोषणाला विरोध केला मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे गावातले सामाजिक वातावरण बिघडत आहे. त्यांना उपोषणाला परवानगी देऊ नये, असे निवेदन ग्रामस्थांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिले होते. या निवेदनावर डॉ. रमेश तारख यांनी सही केली होती. त्यामुळे त्यांच्यावर मनोज जरांगे यांच्या समर्थकांचा राग होता.



    दरम्यानच्या काळात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी तब्बल 9 दिवस उपोषण केले. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, अशी त्यांची मागणी होती. या दरम्यान दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका-टीप्पणी केली. मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये सध्या वाकयुद्ध रंगलेलं असतानाच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

    छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले. या आंदोलकांनी डॉ. रमेश तारख यांचा सत्कार करत असल्याचं दाखवलं. त्यांनी त्यांचा सत्कार केला. यानंतर त्यांनी तारख यांच्या चेहऱ्याला काळं फासले. आंदोलकांनी त्याचा व्हिडिओ बनवला

    या घटनेनंतर डॉ. रमेश तारख यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी नेमकं काय घडलं, या विषयी सविस्तर माहिती दिली. “ते बाहेर येऊन बसले. माझ्याकडे पेशंट चालू होते. माझ्याकडील स्टाफला त्यांनी अरेरावी केली की, आम्हाला केबिनमध्ये जायचं आहे. ते चार-पाच जण होते, त्यामुळे त्यांनी सांगितलं की, थोडं थांबा. पण त्यांनी अरेरावी केली आणि केबिनमध्ये आले. त्यांनी मध्ये आल्यानंतर आधी मला बुके आणि शाल दिली. मी म्हटलं कशाबद्दल? ते म्हणाले, तुमचा वाढदिवस आहे. मी म्हटलं, माझा वाढदिवसाचा काही संबंध नाही. माझा आज वाढदिवस नाहीय. मला थोडासा संशय आला. मी थोडा उठून उभा राहिलो. यानंतर दोघांनी दरवाजा लावला. बाकीच्यांनी मला पकडलं आणि अंगाला काळं लावलं”, असा घटनाक्रम रमेश तारख यांनी सांगितला. तसेच ज्या आंदोलकांनी आपल्याला काळं फासलं त्यातून त्यांची मानसिकता लक्षात येते, अशी प्रतिक्रिया रमेश तारख यांनी दिली.

    डॉ. रमेश तारख हे आधी मनोज जरांगे यांचे जुने सहकारी होते. पण त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध केल्यामुळे संबंधित प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. तर आपण दोन महिन्यांपूर्वी जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती, यानंतर आता आपल्यासोबत असा प्रकार घडल्याचं रमेश तारख म्हणाले. संबंधित प्रकरणी तपास करुन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी रमेश तारख यांनी केली.

    Supporters of Manoj Jarange broke into the hospital and blackmailed the doctor!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस