कोरोना संकटाच्या काळात अनेक आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनेक बालके अनाथ झाली आहेत. त्यांना आधार देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरसावले आहेत. १०० अनाथ बालकांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे.Support to orphans, Devendra Fadnavis accepted custody of 110 orphans
विशेष प्रतिनिधी
नागपूर : कोरोना संकटाच्या काळात अनेक आई-वडीलांचा मृत्यू झाल्याने अनेक बालके अनाथ झाली आहेत. त्यांना आधार देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरसावले आहेत. १०० अनाथ बालकांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले आहे.
नागपूर येथील श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोबत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना संकटात आई-वडील गमावलेल्या 100 मुलांना ट्रस्ट आधार देणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. केवळ भाषणबाजी न करता पहिल्या दिवशी नोंदणी झालेल्या 100 अनाथ मुलांचं पालकत्व स्विकारलं आहे. नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी हे श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे प्रमुख आहेत.
कोरोनाच्या महामारीत अनेकांनी जवळच्या नातेवाईकांना गमावले आहे. कुटुंबेच्या कुटुंबे बाधित झाल्याने अनेक ठिकाणी आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला आहे. सोबत या उपक्रमातून त्यांना मायेचा आधार देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, संस्थेत नोंदणी झालेल्या मुलांची संपूर्ण जबाबदारी घेती आहे. संस्थेच्या या संपूर्ण कार्यामध्ये तुम्हाला जी मदत लागेल ती मी करेनच. या कामासाठीची यंत्रणा तुम्ही उभी केली आहे.
त्यासाठी लागणारे संपूर्ण पाठबळ देईल. कुणाला हा विचार संकुचित वाटेल. पण मी ही एक लोकप्रतिनिधी आहे. मलाही मतदारसंघ आहे. त्यामुळे, दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील ज्यांची तुमच्याकडे त्यांची नोंदणी होईल. त्या सर्वांचा खर्च माझ्यावतीने करण्यात येईल.
Support to orphans, Devendra Fadnavis accepted custody of 110 orphans
महत्त्वाच्या बातम्या
- अविश्वास ठराव आणल्याने चिडून पंचायत समिती सभाकडून सदस्यांवर हल्ला, खेड तालुक्यातील शिवसेनेतील सुंदोपसुंदी उघड
- केजरीवाल सरकारपेक्षा जास्त दिल्लीच्या खासगी रुग्णालयांनी लसींचा बंदोबस्त केला – संबित पात्रा
- मराठा आरक्षणासाठी आताच रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही तर वेळ निघून जाईल, चंद्रकांत पाटील यांचा इशारा
- दहावी झालेला करत होता डॉक्टर म्हणून काम, पिंपरीत बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल
- राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला अखेर अटक, खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे