बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली आहे.Superstar Rajinikanth praises Ranveer Singh’s ’83’
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : 83 हा चित्रपट 1983 मध्ये झालेल्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणींवर करण्यात आला आहे. चित्रपट 24 डिसेंबरला प्रदर्शित झाला आहे. ज्या लोकांनी हा चित्रपट बघितला आहे त्यांनी कबीर खानच्या चित्रपटांमधील हा एक ‘मास्टरपीस’ म्हणून कौतुक केला आहे.बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका निभावली आहे.
संपूर्ण टीमच्या अभिनयापासून ते दिग्दर्शक कबीर खानच्या दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान नुकतंच दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.रजनीकांत यांनी नुकतंच 83 हा चित्रपट पाहिला. यानंतर त्यांनी अधिकृत ट्विटरवर ट्वीट करत याबाबत प्रतिक्रिया दिली.
यावेळी ते म्हणाले, ‘#83TheMovie वाह काय चित्रपट आहे..शानदार!!! निर्माते, कलाकार आणि क्रू यांचे खूप खूप अभिनंदन, असे ट्वीट त्यांनी केले आहे. त्यासोबत त्यांनी याद्वारे कबीर खान, कपिल देव, रणवीर सिंग यांना टॅग करत त्यांचे कौतुक केले आहेत.
Superstar Rajinikanth praises Ranveer Singh’s ’83’
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांना मिळणार १० जानेवारीपासून बूस्टर डोस
- नसीरुद्दीन शाह उवाच : मला पाकिस्तानात पाठवणाऱ्यांनो तुम्ही कैलासात जा, चर्च-मशीद पाडल्या जाताहेत, मंदिर पाडले तर कसे वाटेल?
- ५३ जणांच्या धर्मांतरावर ख्रिश्चन संघटनेचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र, समाजाच्या भावना दुखावल्याचे सांगत घटनेच्या चौकशीची मागणी
- ‘जवा बघतीस तु माझ्याकडं, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ , भाजपच्या निलंबित आमदाराचा जबरदस्त डान्स ; व्हिडिओ वायरल