• Download App
    सुनील शेट्टी आर्यन खानच्या समर्थनात बाहेर; नेटिझन्स म्हणाले, "उडत्या पंजाब"वर बोललात, "उडत्या बॉलिवूड" वर गप्प का?" Sunil Shetty out in support of Aryan Khan

    सुनील शेट्टी आर्यन खानच्या समर्थनात बाहेर; नेटिझन्स म्हणाले, “उडत्या पंजाब”वर बोललात, “उडत्या बॉलिवूड” वर गप्प का?”

    वृत्तसंस्था

    मुंबई : गोवा क्रूज ड्रग्स पार्टी संदर्भात सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स ब्युरोने ताब्यात घेताच बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी आर्यन खानच्या समर्थनासाठी बाहेर येताच नेटिझन्सन बॉलिवूडवर बरसले आहेत. Sunil Shetty out in support of Aryan Khan

    “उडता पंजाब” बनणारे बॉलिवूड आज “उडता बॉलिवूड” बघून हबकले आहे काय? असा बोचरा आणि खोचक सवाल नेटिझन्सनी केला आहे. बॉलिवूडची एक – एक कनेक्शन खोलायला लागल्यावर बॉलिवूड मुळापासून हादरले आहे.



    त्यामुळेच सुनील शेट्टी सारखे अभिनेते शाहरुखच्या मुलाच्या समर्थनासाठी बाहेर आले आहेत, अशी टीकाही सोशल मीडियावर करण्यात येत आहे. याच बॉलिवुडने पंजाबची “उडता पंजाब” म्हणून बदनामी केली. आज तेच बॉलिवूड “उडते बॉलिवूड” झाले आहे. त्याच्यावर मात्र अनेक जण शहामृगाला सारखी वाळूत तोंडे खुपसून बसले आहेत, असेही नेटिझन्सनी एकापाठोपाठ एक तडाखे लगावले आहेत.

    नार्कोटिक्स ब्यूरोने विविध ठिकाणी छापे घालते आहे काही मुलांना पकडले आहे. परंतु, आपण त्या मुलांनी ड्रग्स घेतले असेच गृहीत धरून चालतो. याचा तपास होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या, असे सहानुभूतीचे उदगार सुनील शेट्टीने काढले. यावरूनच तो आर्यन खानच्या समर्थनाला बाहेर आल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. त्यामुळेच नेटिझन्सनी “उडता पंजाब” वरून “उडत्या बॉलिवूडकडे आपल्या तोफा वळविल्या आहेत.

    Sunil Shetty out in support of Aryan Khan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू