• Download App
    Sunetra Pawar's phone call, Congress is preparing for battle from Baramati!! सुनेत्रा पवारांच्या फोन नंतरही काँग्रेस बारामतीतून लढाईच्या तयारीत!!

    सुनेत्रा पवारांच्या फोन नंतरही काँग्रेस बारामतीतून लढाईच्या तयारीत!!

    Sunetra Pawar

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून शिवसेनेचा पाठिंबा मिळविला त्यानंतर त्यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला. त्यांना बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मदत करायची विनंती केली. पण सुनेत्रा पवार यांच्या फोन नंतर सुद्धा काँग्रेस बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवायच्या तयारीत असल्याची बातमी समोर आली.Sunetra Pawar’s phone call, Congress is preparing for battle from Baramati!!

    अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक अपरिहार्य झाली‌ तिथून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी सुद्धा जाहीर झाली. त्यानंतर बारामतीत पवारांची मक्तेदारी कायम राहावी म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही, असा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शरद पवारांशी चर्चा करून तो निर्णय जाहीर केला.



    याच दरम्यान सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून त्यांच्याकडे पाठिंबा मागितला. पण बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार उभा करायचा निर्णय काँग्रेसने आधीच घेतल्याने हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबाचा शब्द देणे टाळले.

    – काँग्रेसकडून धनगर समाजाला प्राधान्य

    काँग्रेस बारामतीतून धनगर समाजाचा उमेदवार द्यायची शक्यता असून आकाश मोरे यांचे नाव त्यासाठी निश्चित झाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. आकाश मोरेचे नाव आज सायंकाळपर्यंत काँग्रेस दिल्लीतून जाहीर करेल, असे त्या बातम्यांमध्ये माध्यमांनी नमूद केले. काँग्रेसमध्ये बारामतीतून लढण्यासाठी चार-पाच नेते इच्छुक असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी आधीच सांगितले होते.

    Sunetra Pawar’s phone call, Congress is preparing for battle from Baramati!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नरेंदर कब मिलेगा सिलेंडर??, वंचित बहुजन आघाडीचे उद्या 6 एप्रिलला महाराष्ट्रात आंदोलन

    बारामती आणि राहुरी; पवारांची दिसली भूमिका दुटप्पी!!

    राहुरी विधानसभा पोटनिवडणूक; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर