• Download App
    Sunetra Pawar देवेंद्र फडणवीसांशी आज झालेल्या चर्चेत सुनेत्रा पवारांचे नावच नव्हते, पण...; प्रफुल्ल पटेलांची माहिती; Between the Lines काय??

    देवेंद्र फडणवीसांशी आज झालेल्या चर्चेत सुनेत्रा पवारांचे नावच नव्हते, पण…; प्रफुल्ल पटेलांची माहिती; Between the Lines काय??

    नाशिक : अजित पवारांनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवारांना मिळणार, अशी वातावरण निर्मिती मराठी माध्यमांनी चालवली असताना प्रत्यक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज झालेल्या चर्चेत सुनेत्रा पवारांचे नावच नव्हते, असा स्पष्ट खुलासा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला. पण त्याचवेळी त्यांनी लोक भावनेचा आदर करून आम्ही निर्णय करू, असे सांगून सुनेत्रा पवारांचे नाव महाराष्ट्रातल्या राजकीय हवेत चर्चेत ठेवले. Sunetra Pawar

    – दोन स्तरांवर चर्चा

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत दोन स्तरांवर चर्चा सुरू आहे. यातला पहिला स्तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण होणार??, अजित पवार यांची खाती कुणाकडे जाणार??, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होऊन राष्ट्रवादीचे मंत्री वाढणार की आहेत तेवढेच राहणार??, हा असून, दुसरा स्तर दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे ऐक्य आणि त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद कुणाकडे द्यायचे??, हा आहे.

    राज्याचे उपमुख्यमंत्री पद आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष पद हा एकमेकांमधला पायगुंता आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आमदार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या घडामोडींविषयी चर्चा करण्यासाठीच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “वर्षा” बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या सगळ्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी सुमारे दीड तास चर्चा केली. वर्षा वरची चर्चा सुरू असताना मराठी माध्यमांनी मात्र सुप्रिया सुळे यांच्या ऐवजी सुनेत्रा पवार यांचेच नाव उपमुख्यमंत्री पदासाठी लावून धरले होते. सुनेत्रा पवारांच्या नावाचा प्रस्ताव घेऊनच प्रफुल्ल पटेल आणि बाकीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या होत्या.

    – सुनेत्रा पवारांचे नावच चर्चेत नव्हते

    प्रत्यक्षात आजच्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांची सुनेत्रा पवारांच्या नावासंदर्भात चर्चा झाली नाही, असा स्पष्ट खुलासा प्रफुल्ल पटेल यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला. अर्थात महाराष्ट्रातल्या आमदारांची भावना लोकांची भावना लक्षात घेऊनच आम्हाला निर्णय करावा लागेल अशी पुस्ती त्यांनी जोडली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत आणि अजित पवारांच्या कडे असलेल्या खात्यांबाबत आम्हाला लवकरात लवकर निर्णय करायचाय. तो आम्ही आमदारांशी बोलून लवकरात लवकर घेऊ. त्यामध्ये लोक भावनेचा आदर करू. पण आज मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत सुनेत्रा पवारांचे नाव नव्हते, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

    त्याचवेळी त्यांनी सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी चर्चा करावी लागेल. आज दिवसभरातला त्यांचा कार्यक्रम पाहून आज सायंकाळी किंवा उद्या या सगळ्यांची चर्चा करू, असेही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.



    Between the Lines

    – वास्तविक अजित पवार यांच्या नंतर सुनेत्रा पवार यांचेच नाव नि:संदिग्धपणे पुढे आणायचे असते, तर ते पवार कुटुंबाने केव्हाच पुढे आणले असते. त्यामध्ये राष्ट्रवादीच्या ऐक्याचा त्यात खोडा घातला नसता. पण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ठरविण्याच्या आधी राष्ट्रवादीच्या ऐक्याची चर्चा सुरू करून सुनेत्रा पवार यांचे नाव अडकून पडेल याची “राजकीय व्यवस्था” केली गेली.

    – त्यामुळेच राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यासारखे नेते मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटल्यानंतर सुद्धा त्यांनी सुनेत्रा पवार यांचे नाव चर्चेत पुढे आणले नाही किंवा आणले असले, तरी ते जाहीरपणे सांगितले नाही. उलट सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा केली नाही, असे प्रफुल्ल पटेल यांना सांगावे लागले.

    – त्यामुळे अजित पवारांचा संपूर्ण अधिकारांचा वारसा जसाच्या तसा सुनेत्रा पवारांकडे सहजपणे येण्यात अडथळा तयार झाला. कारण आजच्या चर्चेत पवार कुटुंबीयांपैकी कोणीही “वर्षा” बंगल्यावर गेले नव्हते. तसे ते जाणे शक्यच नव्हते कारण सगळे पवार कुटुंबीय बारामतीत आहेत.

    – अजित पवारांचे राजकीय सल्लागार आणि design box कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा बारामतीत आले असून ते सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी तसेच अन्य पवार कुटुंबीयांशी चर्चा करत आहेत. राष्ट्रवादीच्या भवितव्या संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो पवार कुटुंबीयांना घ्यायचा आहे, असा खुलासा नरेश अरोरा यांनी केला.

    – या सगळ्या घडामोडी वर वर दिसताहेत किंवा उघड दिसताहेत, तेवढ्या सोप्या आणि खोल्या नाहीत. राष्ट्रवादीतील नेत्यांची स्पर्धा आणि त्यांची वैयक्तिक राजकीय गणिते यात दडली आहेत. केवळ सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करणे हा विषय नाही, तर सुप्रिया सुळे यांचे political setting सुद्धा त्यात दडले आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांचा यातल्या प्रत्येक अपडेट मध्ये व्यवस्थित “राजकीय हात” आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या परवानगीशिवाय एकही घडामोड पूर्णत्वाला जाणार नाही.

    Sunetra Pawar’s name was not discussed with Devendra fadnavis, said Prafulla Patel.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दोन्ही राष्ट्रवादींचे ऐक्य साधण्याच्या मागे मंत्रिपदासाठी प्रचंड स्पर्धा; पक्षाच्या नेतृत्वासाठी देखील खेचाखेच!!

    Sameer Wankhede : समीर वानखेडेंना दिल्ली हायकोर्टाकडून धक्का; आर्यन खानच्या मालिकेविरुद्धची याचिका फेटाळली

    Maharashtra ZP : ZP आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल:7 फेब्रुवारीला मतदान, तर 9 तारखेला होणार मतमोजणी