नाशिक : अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज सायंकाळी उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला होकार दिला. त्यामुळे उद्या दुपारी त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड होईल आणि सायंकाळी उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी होईल. सुनेत्रा पवार यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळतील. पण त्या “मूळच्या पवार घरातल्या” नसतील, तर त्या “बाहेरून पवारांच्या घराण्यात आलेल्या” असतील!!Sunetra Pawar will be deputy chief minister of Maharashtra
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर आज 30 जानेवारी 2026 रोजी दिवसभर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. आजच्या दिवसाच्या सुरुवातीलाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऐक्याची चर्चा शरद पवारांच्या गटातल्या नेत्यांनी ऐरणीवर आणली. पण त्याच वेळी अजित पवारांच्या गटातले नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडींना वेग आला.
– नरेश अरोरांशी चर्चा
सायंकाळपर्यंत सुनेत्रा पवार यांच्याशी व्यवस्थित संपर्क साधण्यात आला. सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार यांना चर्चेमध्ये सहभागी करून घेण्यात आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय काम पाहणारे डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी चर्चा केली. सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला होकार आहे, असा निरोप घेऊन नरेश अरोरा बारामतीतून मुंबईला आले. त्यानंतर सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले.
– पवारांकडून नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी
त्याच दरम्यान शरद पवार बारामती तालुक्यात ऍक्टिव्ह झाले. त्यांनी नीरा नदीच्या प्रदूषणाची पाहणी केली. पण याच वेळी नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्याशी चर्चा करत होते.
– सुनेत्रा पवारांचा उद्या शपथविधी
आज दिवसभरात घडलेल्या घडामोडीनंतर सायंकाळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला होकार दिल्याची बातमी पुढे आली. त्यानुसार उद्या दुपारी 2.00 वाजता विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच अजित पवार गटाच्या सर्व आमदारांची बैठक होणार असून त्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड करण्यात येईल. त्यामुळे त्यांचा उपमुख्यमंत्री बनायचा मार्ग कायदेशीर दृष्ट्या मोकळा होईल. त्यानंतर उद्या सायंकाळी 5.00 वाजता लोकभवनात सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल. हा शपथविधी सोहळा साधा असेल त्यामध्ये कुठलाही तामझाम नसेल. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह निवडक मंत्री उपस्थित असतील.
– सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पिछाडीवर
पण आज घडलेल्या सर्व मोठ्या राजकीय घडामोडींमधून सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व मात्र पिछाडीवर गेल्याचे स्पष्ट झाले. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर सुप्रिया सुळे यांनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यांनी दिल्ली पासून बारामती पर्यंत सर्व घडामोडींमध्ये पुढाकार घेतला होता. अजित पवारांच्या सर्व विधींमध्ये त्यांचाच पुढाकार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यांनी स्वतः सुनेत्रा पवारांचा हात धरून अजित पवारांच्या जवळ नेण्याचे फोटो सुद्धा सगळीकडे व्हायरल झाले होते. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य असतील. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व येईल, असे राजकीय चित्र माध्यमांनी निर्माण केले होते.
– पवारांच्या घरातला सत्तेचा केंद्रबिंदू सुनेत्रांच्या दिशेने
पण प्रत्यक्षात आज सायंकाळपर्यंत सगळे चित्र फिरले. सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला होकार दिला. त्यामुळे पवारांच्या घरातला सत्तेचा केंद्रबिंदू सुनेत्रा पवार यांच्या दिशेने सरकला. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेतृत्व पदाची सूत्रे देखील त्यांच्याकडे येतील अशी चिन्हे ठळकपणे दिसली. त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या ऐक्याची चर्चा देखील काहीशी थंडावली. सगळ्या घडामोडींमध्ये सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पिछाडीवर गेल्याचे उघड झाले.
Sunetra Pawar will be deputy chief minister of Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- अजितदादांचा वारस निवडण्यासाठी पडद्यामागे हालचाली; पवारांच्याच घरातून चर्चा तीन नावांची!!; नेमका अर्थ काय??
- UPSC : UPSC ची नवीन प्रणाली- IAS-IPS च्या कॅडर वाटपाचे नियम बदलले, 25 कॅडरचे 4 गटांमध्ये विभाजन, भौगोलिक झोन रद्द
- UGC : देशभरात UGCच्या नव्या नियमांचा विरोध; UPत सवर्ण तरुणांनी मुंडन केले; सर्वोच्च न्यायालय सुनावणीसाठी तयार
- अजितदादांचा राजकीय वारस एकटे पवार निवडू शकतील, की त्या निवडीत मोदी + शाहांचा वाटा सिंहाचा असेल??