• Download App
    Sunetra Pawar सगळ्या "डावांचे" "अडथळे" पार करत संपूर्ण पवार कुटुंबांच्या गैरहजेरीत सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदी शपथविधी!!

    सगळ्या “डावांचे” “अडथळे” पार करत संपूर्ण पवार कुटुंबांच्या गैरहजेरीत सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदी शपथविधी!!

    नाशिक : आजच्या 31 जानेवारी 2026 रोजीच्या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर संपूर्ण पवार कुटुंबाच्या गैरहजेरीत सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदी शपथविधी झाला. अजित पवारांच्या एक्झिट नंतर सुनेत्रा पवारांचा शपथविधी सहजपणे पार पडणे अपेक्षित होते, पण शरद पवार आणि त्यांच्या गोटातल्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा मध्येच काढून त्यात खोडा घालायचा प्रयत्न केला पण सुनेत्रा पवार यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पवारांचा “डाव” वेळीच ओळखला. त्यामुळे शपथविधीत जरी राजकीय अडथळा आला तरी तो निर्विघ्नपणे पार पडला.

    – फक्त जय पवार हजर

    या शपथविधी समारंभाला संपूर्ण पवार कुटुंबातले फक्त जय पवार मुंबईतल्या लोकभवनात हजर राहिले. बाकी कोणीही सदस्य शपथविधीला हजर नव्हते. शरद पवार बारामतीत होते, तर सुप्रिया सुळे बारामतीतून पुण्याकडे आणि पुण्याहून दिल्लीला रवाना झाल्या. दिल्लीला रवा बनवण्याच्या आधी सुप्रिया सुळे यांनी काटेवाडीत जाऊन अजित पवारांच्या आई आशाताई यांची भेट घेतली. पार्थ पवार हे सुद्धा शपथविधी समारंभाला उपस्थित नव्हते. कारण ते दुपारी बारामतीत शरद पवारांना भेटायला गोविंद बागेत गेले होते.



    शपथविधी समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस सर्व 40 आमदार आणि खासदार आणि निवडक पदाधिकारी उपस्थित होते.

    – देवेंद्र फडणवीस यांचा भक्कम पाठिंबा

    सुनेत्रा पवारांच्या शपथविधी समारंभाच्या आधी आज दिवसभर शरद पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेची चर्चा मराठी माध्यमांनी लावून धरली. सुप्रिया सुळेंचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी या विषयापेक्षा शरद पवारांनी चालवलेला राष्ट्रवादीचा विलीनीकरणाचा मुद्दा मराठी माध्यमांनी आणि त्यांच्या गोटातल्या नेत्यांनी उचलून धरला होता. हा “डाव” खेळून शरद पवारांना सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व पुढे सरकवायचे होते. पण प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्याच पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि शपथविधी घडवून आणला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे उभे राहिले म्हणून शपथविधी निर्विघ्नपणे पार पडला.

    Sunetra Pawar oath ceremony Deputy Chief Minister

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शरद पवारांचा “डाव” उधळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार; उपमुख्यमंत्री होणार (“मूळच्या पवार” नव्हे), तर “बाहेरून आलेल्या पवार”!!

    सुनेत्रा पवारांनी आपल्याला विचारलेच नाही, असे खुद्द शरद पवारांनी सांगितल्यानंतर पार्थ पवार गोविंद बागेत पवारांच्या भेटीला; पण त्याचवेळी पटेल आणि तटकरे मुंबईत सुनेत्रा पवारांच्या भेटीला!!

    महाराष्ट्राच्या राजकारणातली ही तर खरी “क्रांती”; मुंबईत ठाकरे “नॉन प्लस”; उर्वरित महाराष्ट्रात पवार “नॉन प्लस”!!