• Download App
    No Merger of NCP Factions: Sunetra Pawar to be National President, Says Praful Patel राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही, प्रफुल पटेलांची स्पष्ट भूमिका

    Praful Patel : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही, प्रफुल पटेलांची स्पष्ट भूमिका

    Praful Patel

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Praful Patel राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना प्रफुल पटेल यांनी पूर्णविराम दिला आहे. “दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी पक्षाच्या भविष्यातील नेतृत्वाबाबत मोठी घोषणा केली. आगामी २६ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल, असे पटेल यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.Praful Patel

    अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढणे ही पक्षाची जबाबदारी असल्याचे पटेल यांनी नमूद केले. ते म्हणाले, “अजितदादांच्या निधनानंतर ही वेळ विलीनीकरणावर चर्चा करण्याची नाही. आज आमचा पक्ष स्वतंत्र आहे आणि आमची संघटनात्मक पदे किंवा विधिमंडळ नेतृत्वाची जागा भरण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. ती प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत.”Praful Patel



    विमान अपघातावर भाष्य: कंपनीवर फोडले खापर

    अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना प्रफुल पटेल यांनी थेट विमान कंपनीला जबाबदार धरले आहे. “या दुर्दैवी घटनेत विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे. पायलटकडून काही दुर्लक्ष झाले असेल, तर ते सीबीआयच्या (CBI) चौकशीत निश्चितपणे समोर येईल. मात्र, सकृतदर्शनी विमान कंपनी या दुर्घटनेला मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे मला वाटते,” असे त्यांनी स्पष्ट केले.

    शेवटचा फोन ‘शेतकऱ्यांच्या’ कामासाठीच!

    अजित दादांचा अपघात होण्यापूर्वी पूर्व विदर्भातील एका नेत्याचा त्यांना फोन केला होता, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावर प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “अजित पवारांच्या निधनाच्या आदल्या दिवशी मी त्यांना फोन केला होता. पण शेतकऱ्यांसाठी केला होता. कुणाची खासगी फाईल किंवा कुणाला मदत करण्यासाठी केला नाही. एक उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांनी त्या दिवशी माझा फोनसह अनेक लोकांचे फोन त्यांना आले असतील. अनेकांनी त्यांना वेगवेगळ्या कामांची निवेदने दिली असतील. याचा अर्थ मी कुठल्याही कारणाने त्यांना थांबवण्याचे काम केले असा होत नाही. मी तेव्हा दिल्लीत होतो आणि अजित पवार कुठे आहेत हे मला माहीत नव्हते. मी त्यांना दिल्लीतून फोन केला होता”

    रोहित पवारांच्या आरोपाला ‘संयमी’ उत्तर

    “पायलटने अजितदादांचे विमान मुद्दामहून खाली पाडले,” असा खळबळजनक आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. यावर प्रफुल पटेल यांनी अत्यंत सावध आणि जबाबदार प्रतिक्रिया दिली. “मी एक जबाबदार व्यक्ती आहे. अनेक वर्षांच्या राजकारणात आणि सरकारमध्ये माझा अनुभव राहिलेला आहे. मी जे काही बोलेन ते संयमाने आणि जबाबदारीने बोलेन. माझ्याकडे तथ्य असल्याशिवाय कुठलाही आरोप-प्रत्यारोपचे उत्तर देणे मला योग्य वाटत नाही,” असे म्हणत त्यांनी रोहित पवारांच्या आरोपावर थेट भाष्य करणे टाळले.

    सीबीआय द्वारा चौकशी करण्यात यावी, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    अजित दादा यांचे जाणे ही फार दुर्दैवी घटना आहे. या घटनेच्या सखोल तपास विविध यंत्रणेद्वारे होत आहे. राज्य सरकार सुद्धा तपास करत आहेत. परंतु यामध्ये अनेक लोकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे याची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. अचानकपणे एवढी मोठा दुर्घटना कशी होऊ शकते, याची सीबीआय द्वारा चौकशी करण्यात यावी आणि ही महाराष्ट्रात घटना झाल्यामुळे महाराष्ट्र सरकार याबाबत सीबीआयला चौकशी करण्यात सांगू शकते. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आम्ही काल निवेदन देऊन या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे वक्तव्य प्रफुल पटेल यांनी केले

    No Merger of NCP Factions: Sunetra Pawar to be National President, Says Praful Patel

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    पवारांची “डबल गेम”; एकीकडे सरकारी यंत्रणेवर अविश्वास; तर दुसरीकडे सरकारवरच जबाबदारी ढकलली!!

    Ajit Pawar Crash Update : अजित पवार अपघात, डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर सापडला, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर डेटा रिकव्हरीसाठी कंपनीकडे विचारणा

    Chandrapur : काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना इशारा- चंद्रपूरचा बदला आम्ही परभणीत घेतला नाही; दोन्ही पक्षांतील संबंधांवर प्रश्नचिन्ह