विशेष प्रतिनिधी
मुंबई :Sunetra Pawar दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची गुरुवारी एकमताने निवड करण्यात आली. मुंबईतील वरळी येथे आयोजित पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. या निवडीमुळे राज्याच्या राजकारणात आता अधिकृतपणे “सुनेत्रा पर्व’ सुरू झाले असून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरण चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.Sunetra Pawar
वरळी येथे झालेल्या या अधिवेशनात पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात संमती दिली. याच वेळी सुनील तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवली.Sunetra Pawar
पार्थ पवारांचे दिल्लीत पदार्पण आणि संघटनेत पद
अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्याकडे पक्षाने आता मोठी जबाबदारी सोपवण्याचे संकेत दिले आहेत. प्रफुल्ल पटेल यांनी पार्थ पवार यांना राज्यसभेचे उमेदवार म्हणून घोषित केले असून लवकरच त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस हे अत्यंत महत्त्वाचे संघटनात्मक पद सोपवले जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादीच्या सत्तेची आणि संघटनेची सूत्रे आता पूर्णपणे “पवार’ कुटुंबाकडे एकवटली आहे.
आता शरद पवार गटाच्या विलीनीकरणाची चर्चा बंद
शरद पवार आणि अजित पवार गट विलीनीकरणाचे दरवाजे कायमचे बंद झाल्याचे संकेत.
अस्तित्वाची लढाई : विलीनीकरण झाले असते तर अजित पवार गटाच्या नेत्यांना दुय्यम भूमिका मिळाली असती.
भावनिक कार्ड, वारसा : सुनेत्रा पवार यांच्या निवडीतून पक्षाने ‘अजितदादांचा वारसा’ पुढे नेण्याचे संकेत. पण राजकीयदृष्ट्या हे दोन्ही पक्ष वेगळेच राहतील.
पार्थ पवारांची नवी इनिंग : पार्थ यांना राज्यसभा व राष्ट्रीय सरचिटणीसपद देऊन भाजपसोबतची युती भक्कम केली.
Sunetra Pawar Elected NCP National President Parth Pawar Rajya Sabha VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- US Blizzard : अमेरिकेत हिमवादळामुळे 11 हजार विमानांची उड्डाणे रद्द; 5 लाख घरांची वीज गेली
- दुर्दैवी अपघात होता की नियोजित घातपात, अजितदादांच्या विमान अपघाताबाबत युगेंद्र पवार यांचा संशय
- Solar Panels : भारतीय सौर पॅनेलवर अमेरिकेने 126% टॅरिफ लावले; म्हटले- चीन भारतामार्फत स्वस्त उत्पादने पाठवतो
- डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वविक्रम, इन्स्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअर्स