• Download App
    'CBI Probe into Ajit Pawar's Death': Sunetra Pawar Meets CM Fadnavis अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा; सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

    Sunetra Pawar : अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा; सुनेत्रा पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

    Sunetra Pawar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Sunetra Pawar अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी अजित पवारांच्या पत्नी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी केली. त्यावर बुधवारीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे याविषयीचा पत्रव्यवहार केला जाईल, असे आश्वासन फडणवीसांनी दिले.Sunetra Pawar

    सध्या या अपघाताची सीआयडी तसेच डीजीसीए (नागरी विमान वाहतूक संचालनालय), एएआयबीमार्फत (एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो) चौकशी सुरू आहे. गेल्या सहा दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार सातत्याने या अपघाताविषयी संशय व्यक्त करत आहेत. हा अपघात नसून घात असल्याचा आरोप त्यांनी केला.Sunetra Pawar



     

    राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही नेत्यांकडेही ते अंगुलीनिर्देश करत होते. त्यामुळे पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक्सबॉक्स खराब झाल्याची माहिती समोर येत आहे, असा दावा रोहित यांनी केला. त्यावर एएआयबीने स्पष्ट केले की, डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील सर्व माहिती सुरक्षित आहे. ही माहिती डाऊनलोड करण्यात यश आले आहे.

    दरम्यान, दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपल्याचाही सांगत रोहित म्हणाले की, अजित पवार-जयंत पाटील यांच्या ११ वेळा याच मुद्यावर बैठका झाला. जयंत पाटील यांचे घर मंत्री लोढांच्या घरासमोर आहे. त्यामुळे लोढांच्या घरचे सीसीटीव्ही फुटेज तपासावे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले. माझा भाऊ राहिला नाही. त्यामुळे आता त्या चर्चांना काही अर्थ उरत नाही.

    रेकॉर्डरमधील एल-३ संभाषण प्रयोगशाळेकडे

    एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या (एएआयबी) सूत्रांनी सांगितले की, दोन्ही रेकॉर्डर बाहेरून जळाले असले, तरी त्यातील ‘डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर’ (डीएफडीआर) मधील एल-३ संभाषण सुरक्षित आहे. एएआयबीने हा डेटा यशस्वीपणे डाऊनलोड केला असून, तांत्रिक विश्लेषणासाठी तो प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे.

    काही नेत्यांचा शरद पवार, सुप्रियांना विरोध : रोहित

    रोहित पवार म्हणाले की, आपले महत्त्व टिकून राहावे यासाठी काही नेते शरद पवार, सुप्रियांना विरोध करत आहेत. अजितदादा आम्हाला नेहमी जयंत पाटील यांच्या घरीच भेटायचे. पाटील यांच्या घरासमोर मंत्री लोढांचे घर आहे. तिथे गेल्या दीड वर्षातील सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा, म्हणजे अजितदादा आम्हाला किती वेळा भेटले हे कळेल.

    एल-३ संभाषण म्हणजे विमानातील अंतिम संवाद

    अपघातग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्स जळाल्याचा दावा कितपत खरा आहे?

    -हा दावा धक्कादायक आहे. कारण अपघातातील आग मर्यादित होती. हे ११००°C तापमानात १ तास, तर २६०°C तापमानात १० तास तग धरू शकते. त्यामुळे ब्लॅकबॉक्सचे कवच भस्मसात होणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. तरीही असे घडले असेल तर ही तांत्रिक चूक की घातपात, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो.

    एल-३ संभाषण म्हणजे काय?

    – एल-३ संभाषण म्हणजे विमानातील कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरद्वारे रेकॉर्ड केलेला वैमानिक आणि क्रू मेंबर्सचा अंतिम संवाद होय. तांत्रिक बिघाड, आगीची घटना किंवा आपत्कालीन परिस्थितीत वैमानिकांनी काय संवाद साधला, हे यावरून समजते आणि अपघात तपासासाठी ते महत्त्वाचे पुरावे मानले जाते.

    ‘CBI Probe into Ajit Pawar’s Death’: Sunetra Pawar Meets CM Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    रोहित पवारांनी तेलगू देशम पार्टीला आणि भाजपला ओढले संशयाच्या जाळ्यात; पत्रकार परिषदेतून आरोप आणि दाव्यांच्या फैरी!!

    Himanta Biswa Sarma : हिमंता म्हणाले-2014 मध्ये सोनिया मला मुख्यमंत्री बनवायला तयार होत्या; राहुल यांनी नेत्यांना फोन करून परिस्थिती बदलली

    Congress-NCP : राज्यातील मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याचा 2014चा निर्णय अखेर रद्द; 2014 मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने घेतला होता निर्णय