विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sunetra Pawar राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या घडामोडींमध्ये नवा ट्विस्ट समोर आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. पत्रकारांनी प्रफुल्ल पटेल कुठे आहेत? असा थेट प्रश्न विचारताच, ते कधी येतात, कधी जातात हे तुम्हालाच माहिती असेल, असा टोला सुनेत्रा पवार यांनी लगावला. त्यांच्या या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.Sunetra Pawar
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हातात आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे पक्षातील अंतर्गत समीकरणांबाबत आधीच प्रश्न निर्माण झाले होते. आता दिल्ली दौऱ्यात दोन्ही वरिष्ठ नेते सुनेत्रा पवारांसोबत दिसले नाहीत, यामुळे या चर्चांना अधिकच बळ मिळालं आहे.Sunetra Pawar
विशेष म्हणजे, प्रफुल्ल पटेल दिल्लीमध्ये असल्याची माहिती असतानाही ते सुनेत्रा पवारांसोबत दिसले नाहीत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचं कारण काय, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. दुसरीकडे, सुनिल तटकरे हे हनुमान जयंतीनिमित्त रायगडमध्ये असल्याचं सांगितलं जात असलं तरी, दोन्ही वरिष्ठ नेते एकाच वेळी अनुपस्थित असणं ही बाब लक्षवेधी ठरली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, पक्षाच्या अंतर्गत घडामोडींना आणखी एक नवं वळण मिळालं आहे. 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या मिनिट्समध्ये पक्षाच्या संविधानात बदल करण्यात आल्याचं समोर आलं आहे. याबाबत सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र देत काही पत्रव्यवहार रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पक्षाच्या रचना आणि निर्णयप्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पक्षाच्या नव्या संविधानात मोठे बदल
याशिवाय, पक्षाच्या नव्या संविधानातही मोठे बदल करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अल्पसंख्याक, सामाजिक आणि ओबीसी सेलसह एकूण सात फ्रंटल सेल होते. मात्र नव्या बदलांनुसार युवक, विद्यार्थी, महिला आणि सेवादल या चारच सेलचा समावेश ठेवण्यात आला आहे. या बदलांमुळे पक्षाच्या भविष्यातील धोरणांवर आणि संघटनात्मक रचनेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. एकूणच, सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यामुळे आणि घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली अंतर्गत हालचाल पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
NCP Internal Rift? Praful Patel Absent During Sunetra Pawar’s Delhi Visit
महत्वाच्या बातम्या
- भोंदू बाबा अशोक खरातची बायको फरारी; पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी
- AI Data : संशोधनाचा इशारा: AI डेटा सेंटर्समुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ, जाणून घ्या डेटा हीट आयलंड इफेक्टबद्दल..
- PM Modi : आसाममध्ये भाजपच्या विजयाची हॅटट्रिक होणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास
- Govt Caps : जेट इंधन 100% महाग, पण भारतात दरवाढ मर्यादित; प्रवाशांना मोठा दिलासा