नाशिक : शरद पवारांच्या घराण्यातल्या थोरल्या सुनबाई सुनंदा पवारांनी शरद पवारांच्या वाढदिवशी आता पवार कुटुंबाची एकत्र वळलेली मूठ हवी, तरच ताकद कायम राहील. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे किंवा न यावे याबद्दल शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला मी काही सांगणार नाही, पण कुटुंबाची ताकद एक व्हायची असेल, तर एकत्रच वळलेली मूठ हवी, असे सुनंदा पवार म्हणाल्या होत्या. Sunanda pawar feared rohit pawar defeat in karjat jamkhed
त्यावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधून आनंद व्यक्त होत दोन्ही पवारांनी म्हणजेच काका – पुतण्यांनी एकत्र यावे, अशी सूचना अंकुश काकडे वगैरे नेत्यांनी केली होती. पवारांच्या वाढदिवशी सुनंदा पवारांचे वक्तव्य मोठ्या प्रमाणावर त्यांच्या समर्थकांनी व्हायरल केले होते. रोहित पवारांनी देखील सुनंदा पवार केवळ आपल्या मातोश्री नसून त्या पवारांच्या घराण्यातल्या थोरल्या सुनबाई आहेत, असे सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर सुनंदा पवारांच्या वक्तव्याकडे बारकाईने पाहिले, तर सकृतदर्शनी त्यांनी योगी आदित्यनाथ यांची “बटेंगे तो कटेंगे” अशी भाषा वापरल्याचे जरूर दिसते, पण त्या पलीकडे जाऊन सुनंदा पवार यांच्या वक्तव्याकडे आणखी सूक्ष्म नजरेने पाहिले, तर मूळात “बटेंगे तो कटेंगे” यापेक्षाही रोहित पवारांच्या पायाखालची वाळू कर्जत जामखेड मधून घसरली, त्यामुळेच त्यांना वळलेल्या मुठीच्या ताकदीची महती समजली, असे दिसून येते.
अन्यथा जोपर्यंत शरद पवार हे सुप्रिया सुळे इतकेच रोहित पवारांना राजकीय महत्त्व देत होते, किंवा अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारला आम्ही कवडीची किंमत देत नाही, असे म्हणत होते, तोपर्यंत सुनंदा पवारांना वळलेल्या मुठीच्या ताकदीचे महत्त्व कळले नव्हते. शरद पवारांनी पार्थ पवार विषयी त्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असे उद्गार काढले, त्यावेळी सुनंदा पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. किंबहुना अजित पवारांचे कुटुंब आणि राजेंद्र पवारांचे कुटुंब यांच्यातल्या सुप्त राजकीय संघर्षात शरद पवारांनी राजेंद्र पवारांच्या कुटुंबाची म्हणजेच त्यांच्या मुलाची रोहित पवारांची बाजू उचलून धरली, त्यावेळी सुनंदा पवार एकत्र वळलेली मूठ हवी, असे म्हणाल्याचे कुठे प्रसिद्ध झाले नव्हते. किंवा तसे व्हिडिओ व्हायरल झाले नव्हते.
पण कर्जत जामखेड मध्ये भाजपचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांनी रोहित पवारांना असा काही दणका दिला की त्यांचा पुरता “राजकीय शाहिस्तेखान” केला. रोहित पवारांच्या त्यांच्या राजकीय प्राणावर बेतले होते, ते बोटांवर निभावले. विधानसभा निवडणुकीत रोहित पवार फक्त 1243 मतांनी निवडून आले. अजित पवारांनी तिथे सभा घेतली असती, तर रोहित पवारांचे काही खरे नव्हते, हे खुद्द अजित पवार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीपाशी म्हणाले होते. यातले राजकीय गांभीर्य ओळखून सुनंदा पवारांनी पवार कुटुंबाची एकत्र वळलेली मूठ हवी, असे उद्गार काढले. त्यामागे “बटेंगे तो कटेंगे” या योगी आदित्यनाथांच्या उद्गारांची सावली असेलही, पण वस्तुस्थिती हीच होती, की रोहित पवारांच्या पायाखालची वाळू कर्जत जामखेड मध्ये घसरली, त्यामुळेच सुनंदा पवारांना एकत्र मुठीतली ताकद आठवली!!
Sunanda pawar feared rohit pawar defeat in karjat jamkhed
महत्वाच्या बातम्या
- Mani Shankar Aiyar मणिशंकर अय्यर म्हणाले- गांधी परिवाराने माझे करिअर उद्ध्वस्त केले, सोनिया-राहुल 10 वर्षांत एकदा भेटले
- Omar Abdullah: ओमर अब्दुल्लांनी काँग्रेसचे उपटले कान, म्हणाले- EVMवर रडणे थांबवा, विश्वास नसेल तर निवडणूक लढवू नका!
- Ustad Zakir Hussainतबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73व्या वर्षी निधन; 2023 मध्ये पद्मविभूषणने सन्मान
- Danish Merchant : मुंबई पोलिसांनी दाऊदचा साथीदार डॅनिश मर्चटला अटक