प्रतिनिधी
मुंबई : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीच्या उमेदवारांविरुद्ध उमेद आपले उमेदवार उभे करू नयेत, असा सल्ला शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिल्याबरोबर प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी रोहित पवारांना फाटकारले आहे. बहुजनांनी तुम्हा उच्चवर्णीयांसाठी कायमच बलिदान देत राहायचे का??, असा परखड सवाल सुजात आंबेडकरांनी ट्विटर द्वारे केला आहे. Sujat Ambedkar scolded Rohit Pawar
“इंडिया” आघाडीचा भाजप विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. परंतु, त्या आघाडीने वंचित बहुजन आघाडीला आपल्यात सामावून घेतलेले नाही, तरी देखील रोहित पवारांनी वंचित बहुजन आघाडी कडून “इंडिया” आघाडी विरोधात उमेदवार उभा न करण्याची अपेक्षा धरली आहे त्यामुळेच सुजात आंबेडकरांनी त्यांना स्पष्ट शब्दांत फटकारले आहे.
भाजपा विरोधी I.N.D.I.A. आघाडीत सामावून घेण्याची विनंती एमआयएम आणि वंचितच्या काही नेत्यांनी इच्छा अनेकदा केली. पण आघाडीतल्या नेत्यांनी त्यांचे ऐकलेले नाही त्यांना दूरच ठेवले आहे पण तरी देखील शरद निष्ठ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी वंचितनेच उमेदवार उभे करू नयेत असा सल्ला दिला म्हणून सुजात आंबेडकरांनी त्यांना परखड बोल ऐकणारे ट्विट लिहिले.
या ट्विटमध्ये सुजाता आंबेडकर म्हणतात :
इंडिया आघाडी आम्हाला आपल्यात सामावून घेत नसेल तर आम्ही काय करायचं? आम्ही निवडणूकच लढायची नाही का?? आम्हाला जो सल्ला दिला जातोय, तोच सल्ला तुम्ही तुमच्या पक्षांना का देत नाही? देशातील वंचितांनी आणि बहुजांनी नेहमीच उच्चवर्णीयांसाठी बलिदान द्यावं असं वाटतंय का? जसं तुम्ही शतकानुशतके करत आला आहात.
भलेही इंडिया आघाडीच्या निर्णय प्रक्रियेत रोहित पवार तुम्ही सहभागी नसतील पण, “इंडिया” आघाडीच्या महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेण्याबद्दल एकवाक्यता का नाही?? वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीविरोधात उमेदवार उभा करू नये ही भूमिका घेताना इंडिया आघाडीच्या नेत्यांनी स्वतः वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देऊन मतांची फूट टाळण्याचा प्रयत्न का करू नये? ‘फोडा आणि राज्य करा’ ही भाजपाची निती स्पष्ट असताना वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीपासून दूर ठेवून फूट का पाडली जात आहे? सर्वांनी दोन पावलं मागे घेण्याची गरज असेल, तर जे आधीच मागे आहेत त्यांनी आणखी किती पावलं मागे जायचे??
Sujat Ambedkar scolded Rohit Pawar
महत्वाच्या बातम्या
- वाराणसीमध्ये रामदेव बाबांची सनातनद्वेष्ट्यांवर जोरदार टीका; २०२४चा उल्लेख करत म्हणाले…
- मराठवाड्याचे शोषण थांबवून तहान भागविणाऱ्या मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेला संजीवनी!!
- अँकर्स वरच्या बहिष्काराची भाषा काँग्रेसने बदलली, सविनय आंदोलनाची केली; पण प्रत्यक्षात बंदीची “मात्रा” चालवलीच!!
- UAE ने PoKला भारताचा भाग म्हणून दाखवले; भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरचा नकाशा जारी; 370 हा भारताचा मुद्दा असल्याचे सांगितले